अनेकवेळा घर भाडे न भरल्यामुळे एखाद्या कुटुंबाला किंवा व्यक्तीला मध्यरात्रीच घराच्या बाहेर काढण्यात येते. महिना संपला कि घर मालक भाडे घेण्यासाठी दारात येऊन उभा राहतो. जर कुटुंबाने भाडे वेळेत दिले नाही तर त्याला त्वरीत घर खाली करण्याचा सल्ला मालकाकडून देण्यात येतो. दरम्यान याच घर भाडे न भरण्याच्या मुद्द्यावरुन न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल सुनावला आहे.
यामुळे भाड्याने राहणाऱ्या कुटुंबीयांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सांगितले आहे की, भाडे न भरणे हा भारतीय दंड संहितेअंतर्गत येणारा दंडणीय गुन्हा नाही. संबंधित प्रकरणात घरमालकाने आपल्या भाडेकरू विरोधात एफआयआर दाखल केली होती. या कारणाने न्यायालयाने घरमालकालाच चांगले सुनावले आहे.
न्यायालयाने यावेळी म्हटले आहे की, भाडेकरूने जर काही अडचणींमुळे भाडे भरले नाही तर तो गुन्हा ठरणार नाही. तसेच याप्रकरणी भादंवि कलमांतर्गत कोणतीही शिक्षा सुनावण्यात येणार नाही. हा निकाल संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने दिला आहे.
यावेळी तक्रारीत दिलेले तथ्य खरे असले तरी हा गुन्हा नाही असे आमचे मत आहे. भाडे न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, परंतु आयपीसीअंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार नाही. तसेच तशी परिस्थितीही नाही. असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
तसेच न्यायालयाने याचिकाकर्त्यावरील तक्रारी मागे घेण्याचे आदेश घरमालकाला दिले आहेत. दरम्यान गेल्या कित्येक दिवसापासून घर भाडे भरत नसल्यामुळे मालकाने आपल्या भाडेकरी विरोधात तक्रार नोंदवली होती. यासंबंधीत याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने भाडेकरुंच्या बाजूने निकाल दिला आहे.
अनेकवेळा भाडेकरुंनी घर भाडे न दिल्यामुळे त्यांना घरातुन बाहेर हकलण्याच्या तसेच त्यांना मारहाण करण्याच्या घटना आपल्याकडे घडल्या आहेत. याप्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मालकाला अटक देखील झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
द काश्मीर फाईल्स पाहिल्यानंतर लोकांवर होत आहे ‘हा’ परिणाम, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
‘पावनखिंड’मध्ये साक्षात शिवरायांच्या रूपात नायक, तर ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये खतरनाक अतिरेकी बिट्टा
‘तू बोल्ड फोटोशूट का करत नाहीस?’ चाहत्याच्या प्रश्नावर विद्या बालनने दिले ‘असे’ उत्तर
शेअर बाजारात नुकसान झाल्यामुळे आत्या-भाच्याने संपवले जीवन; सुसाईड नोटमध्ये जे लिहीलं ते वाचून थरकाप उडेल