सध्या सर्वत्र दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.
तर दुसरीकडे हा चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करावा, या मागणीसाठी आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री केले आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा अशी मागणी केली आहे.
अशातच द कश्मीर फाईल या चित्रपटात हिंदूंचा इतिहास दाखवला आहे, त्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा इशारा भाजप नेते राम कदम यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.
https://www.facebook.com/ram.kadam/posts/2259053924248782
तर दुसरीकडे भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी देखील अशीच मागणी केली आहे. जम्मु कश्मिरमध्ये दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण करणाऱ्या ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी महेश लांडगे यांनी केली आहे.
सध्या मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. याआधीही गुजरात, हरियाणा आणि कर्नाटक येथे हा चित्रपट करमुक्त केला आहे. त्या धर्तीवर राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
नुकतंच या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माहितीनुसार, ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच ११ मार्चला शुक्रवारी ३.५५ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी ८.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यात खळबळ! शिक्षकांसमोर वर्गात घुसून 10 वीच्या विद्यार्थिनीवर केले चाकूनं सपासप वार; आरोपी पसार
गुप्तधनाच्या लासेपोटी काका-काकीने दिला चिमुकल्याचा बळी, तीन तुकडे केले अन्.., पोलिसही हादरले
आघाडीत बिघाडी! …तर मी तुमची हाडे मोडेन; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला थेट इशारा
अमृता सिंहला घटस्फोट दिल्यानंतर करिनाला डेट करत होता सैफ, राणी मुखर्जीने दिला होता ‘हा’ सल्ला