Share

देशाची प्रतिमा ‘अल्पसंख्याकविरोधी’ झाल्यास भारतीय कंपन्यांना नुकसान होईल, रघुराम राजन यांचा इशारा

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन वेळोवेळी देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर भाष्य करत असतात, आणि संभाव्य धोक्याबाबत चिंता व्यक्त करत असतात. सध्या देशात काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांनी आपलं मत व्यक्त करत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

रघुराम राजन यांनी ‘अल्पसंख्यांक विरोधी’ देशाची प्रतिमा निर्माण झाल्यास संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे. रघुराम राजन यांनी म्हटलं आहे की, जगात भारताची प्रतिमा ‘अल्पसंख्यांक विरोधी’ बनली तर भारतीय कंपन्यांचं नुकसान होऊ शकतं. भारतीय उत्पादनांसाठी मार्केटमध्ये ही धोक्याची घंटा आहे.

अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावर बोलताना रघुराम राजन म्हणाले की, अल्पसंख्यांकांसोबत दुर्व्यवहार जगभरात चांगली प्रतिमा तयार करत नाही. अशामुळं चांगले गुंतवणूकदार दूर जाऊ शकतात, त्यांच्या तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोणामध्ये  विश्वासार्हता नसेल, असं राजन यांनी म्हटलं आहे.

रघुराम राजन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, लोकशाहीमध्ये गोष्टी नेहमी सोप्या नसतात. यात नेव्हिगेशनची गरज असते. लोकशाहीत वेळोवेळी सर्व पक्षांशी चर्चा करावी लागते. गरज पडल्यास काही बदल देखील करावे लागतात. त्यांनी रशिया आणि चीनचं उदाहरण देत म्हटलं की, या देशांमध्ये चेक आणि बँलंस नसल्यानं त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय.

कोरोना काळात उद्योगांना झालेल्या नुकसानी बद्दल सरकारला सल्ला देताना म्हटले की, कोरोना महामारीचा तंत्रज्ञान आणि मोठ्या भांडवली कंपन्या लहान व्यवसाय आणि उद्योगांपेक्षा खूप जलद गतीने परिणाम झाला आहे. त्यांना कोरोनानं अधिक प्रभावित केलं आहे, असे म्हणाले.

यावर त्यांनी सरकारला सल्ला दिला की, मध्यमवर्गीय, लहान आणि मध्यम क्षेत्र आणि सर्वसामान्यांवर पडणारा परिणाम यावर सरकारने अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. त्यामुळे सरकारने काळजीपूर्वक विचार करून खर्च करायला हवा, असे रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now