Share

“हनुमान चालीसा वाचून जर प्रश्न सुटणार असतील तर नरेंद्र मोदींच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचावी”

राणा दाम्पत्यावरून सध्या महाराष्ट्र राजकारणात चांगलाच वाद पेटला आहे. राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या घराबाहेर हनुमान चालीसाचा गोंधळ केला या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी रवी राणा यांना चांगलच फैलावर घेतलं आहे.

भास्कर जाधव म्हणाले, कोण हा फडतूस रवी राणा, कुठं होता, बाळासाहेब ठाकरे यांनी तुझ्यासारख्या माणसाला कधीच शिवसेनेत घेतलं नसतं. हनुमान चालीसा वाचण्यामुळं जर प्रश्न सुटणार असतील तर नरेंद्र मोदींच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचावी, जेणेकरून त्यांनी 15 लाख रूपये देण्याचं आश्वासन दिलं होतं ते पुर्ण होईल, असा सल्ला भास्कर जाधवांनी राणा यांना दिला आहे.

तसेच म्हणाले, रवी राणा हे भाजपचे समर्थक आहेत. त्यांनी शिवसेनेची काळजी करु नये. बाळासाहेबांच्या मनात काय आहे किंवा होतं हे तुझ्यासारख्या फडतूस माणसाने सांगण्याची गरज नाही असं म्हणत रवी राणा यांच्यावर टोला लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलनासारखी परिस्थिती निर्माण झाल्याच्या कारणानं राणा दाम्पत्यावर कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयानं राणा दाम्पत्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राणा दाम्पत्याला झालेल्या अटकेनंतर राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा नवीन संघर्ष पाहायला मिळाला.

राणा दाम्पत्याची भेट घ्यायला गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर उपस्थित शिवसैनिकांनी दगडफेक करत हल्ला केला, ज्यात सोमय्यांना दुखापतही झाली. यावर बोलत असताना भास्कर जाधव यांनी, प्रसिद्धीच्या झोकात राहण्यासाठी सोमय्यांनीच हा हल्ला करवून घेतला असू शकतो असा संशय व्यक्त केला आहे.

म्हणाले, किरीट सोमय्यांवर दगडहल्ला झाला की त्यांनी तो करवून घेतला हा संशोधनाचा विषय आहे. रात्री साडेनऊ-दहा वाजता ते पोलीस स्टेशनला का गेले होते, काय काम होतं त्यांचं? नियमाप्रमाणे आरोपीचे वकील आणि नातेवाईक त्यांना भेटायला जाऊ शकतात. तुमचं आणि राणा दाम्पत्याचं नातं काय हे महाराष्ट्रासमोर स्पष्टपण येऊ द्या.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now