‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे इतर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाला मोठा फटका बसला आहे. अशावेळी शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटासंदर्भात एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेज मध्ये असे लिहिले आहे की, ‘शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट फ्लॉप ठरला तर शाहरुख त्याचं ‘मन्नत’ घर विकणार आहे.’ सध्या या मेसेजची चर्चा होत असून, तो खरा की खोटा याबद्दल बोलले जात आहे.
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर 2 मार्च रोजी प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये शाहरुख-दीपिका आणि जॉन अब्राहमही दिसत होता. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, पठाण चित्रपटाशी संबंधित एक दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ज्या मेसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यामध्ये लिहिले आहे की, ‘शाहरुख खानने केले भावनिक आवाहन.. त्याचा ‘पठाण’ चित्रपट फ्लॉप झाला तर घर विकले जाईल, शाहरुखला घर विकायला मदत करूया.’ अशा आशयाचा मेसेज व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांमध्येही चर्चा होऊ लागली आहे.
मात्र, खरच हा मेसेज योग्य आहे का ,आणि शाहरूख ने घर विकण्याबद्दल दावा केला होता का याबद्दल एका वृत्तवाहिनीने पडताळणी केली असता व्हायरल होणारा मेसेज हा खोटा असल्याचं समोर आलं. शाहरुख खानाने घर विकण्यासंदर्भात कोणताही दावा केला नसल्याचं समोर आलं आहे.
शाहरुख खानशी संबंधित व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, त्याचे सोशल मीडियावरील खाते तपासले गेले. शाहरुखने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून 2 मार्च 2022 रोजी केलेल्या पोस्टमध्ये पठाण चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. यामध्ये शाहरुख ने घराबद्दल काहीही बोलल्याचं आढळलं नाही.
शाहरुख च्या ट्विट मध्ये लिहिले होते की, ‘मला माहित आहे की उशीर झाला आहे… पण तारीख लक्षात ठेवा… ‘पठाण’ ची वेळ आता सुरू होत आहे… भेटू 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये. हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होत आहे. #Pathan सोबत #YRF50 फक्त तुमच्या जवळच्या मोठ्या स्क्रीनवर साजरा करा.’
I know it’s late… But remember the date… Pathaan time starts now…
See you in cinemas on 25th January, 2023.
Releasing in Hindi, Tamil and Telugu.
Celebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you. @deepikapadukone |@TheJohnAbraham | #SiddharthAnand | @yrf pic.twitter.com/dm30yLDfF7
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 2, 2022
संपूर्ण ट्विटमध्ये कुठेही त्याच्या घराच्या विक्रीशी संबंधित काहीही सांगण्यात आलेले नाही. यासोबतच शाहरुख खानने 2 मार्च 2022 रोजी त्याच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवरून पठाण चित्रपटाचा जो टीझर शेअर केला होता. त्या पोस्टमध्ये देखील कुठेही व्हायरल दाव्याशी साधर्म्य असलेल्या गोष्टीचा उल्लेख आढळला नाही.
याशिवाय, पठाण आणि शाहरुखच्या घराशी संबंधित कीवर्डसह शोध घेतल्यानंतर, त्यात देखील कोणतीही बातमी सापडली नाही ज्यामध्ये शाहरुखने त्याच्या घराच्या विक्रीबद्दल बोलले. तसेच Wion News च्या वेबसाईटवर चित्रपटाच्या फर्स्ट लुकशी संबंधित जो लेख सापडला. त्यात देखील व्हायरल दाव्याशी संबंधित काहीही आढळले नाही.