Share

पालकच इंग्रजीत संस्कार करत असतील तर.., अभिनेते अरूण नलावडेंनी बोलून दाखवली नाराजी

मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे अभिनेते अरुण नलावडे यांनी मराठी भाषे बाबतची त्यांची मनातील नाराजी बोलून दाखवली आहे. मराठी भाषा पुढे न जाण्यामागे, असणारे कारण देखील त्यांनी सांगितले आहे.

सध्या अरुण नलावडे हे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत मनोहर देशपांडे ही भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर आहे. याच पार्श्वभूमीवर अरुण नलावडे सकाळ ‘अनप्लग’ या पॉडकास्ट मध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मराठी भाषे बाबतची मनातील नाराजी बोलून दाखवली.

गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेचा मुद्दा वारंवार पुढे येत आहे. मराठी भाषा टिकवी, ती जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. पण तरीही मराठी भाषेला हवा तसा बहुमान मिळत नाही. याबद्दल अरुण नलावडे यांनाही प्रश्न विचारण्यात आला.

यावर अरुण नलावडे यांनी उत्तर दिले की, मराठी भाषा का पुढे जात नाही याचे मूळ आपल्या घरातच आहे. शिवाय याला दुसरे तिसरे कोणी नसून पालक जबाबदार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या शिवाय भाषा टिकण्यासाठी काय करायला हवं, कशा कलाकृती निर्माण करायला हव्या अशा अनेक मुद्यांवर त्यांनी भाष्य केले आहे.

भाषेच्या मुद्द्यावर त्यांनी मांडलेले विचार अत्यंत परखड आणि प्रभावी आहेत. म्हणाले, जर एक वर्षाच्या मुलाबरोबर त्याचे आई वडील इंग्रजी मधून बोलत असतील तर मराठी भाषा आपण टिकवणार कशी? आपण ती मुलांना शिकवली पाहिजे. आपणच जर मराठीत न बोलता थेट How are you वगैरे बोलायला लागलो तर त्याला मराठी शब्द माहितीच कसा होणार असे ते म्हणाले.

पुढे म्हणाले, मराठी भाषा घरातून सुरू होईला पाहिजे. घरी जसं वातावरण असतं, तसेच मुलं वागतात, तसेच बोलतात, त्याच गोष्टींचे ते अनुकरण करतात. त्यामुळे त्या भाषेचा अभ्यास घरातून सुरू होयला पाहिजे. शाळेत तो विषय शिकवला जातो किंवा नाही हा नंतरचा भाग आहे. आपण सरकारला शिव्या घालण्यापेक्षा आपण कुठे चुकतो याबाबत थोडा विचार करावा असे अरुण नलावडे म्हणाले.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now