Share

मुसेवालाला माझ्या मुलाने मारले असेल तर त्याचे एन्काऊंटर करा, मला काहीही दुख: होणार नाही; आरोपीच्या आईने स्पष्टच सांगीतले

crime
काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणाचा पोलीस सध्या जोरदार तपास करत आहेत. या प्रकरणात पोलिसांना मोठा सुगावा लागला आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात सहभागी झालेल्या आठ शूटर्सची ओळख पटली आहे.

तसापादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी एका दोषीचे नाव समोर आले आहे. जगरूप सिंग असे या तरुणाचे नाव आहे. जगरूप सिंग हा तरनतारन येथील रहिवासी आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जगरूप सिंगच्या घरी भेट दिली. मात्र तेव्हा घराला कुलूप होते.

त्यानंतर जगरूपच्या कुटुंबीयांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘सिद्धू मुसेवालाला आपल्या मुलाने मारले असेल, तर पोलिसांनी त्याचा एन्काउंटर करावा, काहीही दुःख होणार नाही,’ असं जगरूप सिंगच्या आईने स्पष्टच सांगितलं आहे. मुलाला ड्रग्जचे व्यसन होते, असेही त्यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना जगरूपच्या आईने म्हंटले आहे की, आपल्या मुलाने काही चूक केली असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, कारण चुकीचे परिणाम नेहमीच चुकीचे असतात, असेही त्यांनी सांगितले आहे. 2017 मध्ये जगरूप सिंगला घरातून हाकलून दिले होते, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रातील पुण्यामधील दोन शूटर्सचा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमध्ये सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी या दोन शूटर्सची नावे आहेत. संतोषच्या आईची प्रतिक्रिया समोर आली आहे. सीता जाधव असे त्यांचे नाव आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणतात, ‘संतोष जाधवचे वय अवघे 23 वर्षांचे आहे. तो एवढा मोठा शूटर होऊ शकत नाही, असे सीता जाधव यांनी यावेळी बोलताना स्पष्टच सांगितले आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘जर संतोष दोषी असेल तर त्याने पोलिसांच्या स्वाधीन व्हावे,’ अस देखील त्यांनी यावेळी बोलताना म्हंटले आहे. मुलाला पाठिशी घालणार नाही, असही त्यांनी बोलताना ठणकावून सांगितलं आहे. सोबतच ‘चुकीचं काही केले असेल तर त्याची शिक्षा भोगून ये,’ असा सल्ला देखील त्यांनी संतोषला दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर क्राईम ताज्या बातम्या बाॅलीवुड राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now