Share

Chandrashekhar Bawankule : पुरुषांनी लाडक्या बहिणींचे पैसे घेतलेत? तर गुन्हा दाखल केला पाहिजे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

Chandrashekhar Bawankule : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील लाभ जर पुरुषांनी घेतले असतील, तर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल व्हावा आणि चुकीने मिळवलेले पैसेही परत वसूल करण्यात यावेत.

नागपूर (Nagpur) येथे पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, महिलांनाच उद्दिष्ट ठेऊन राबवलेल्या या योजनेत काही पुरुषांनी अपात्र असूनही लाभ घेतल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. सरकारने यापूर्वी स्पष्ट केले आहे की चुकीच्या पद्धतीने महिलांनी लाभ घेतला असेल, तर त्यांच्याकडून वसुली केली जाणार नाही. मात्र पुरुष लाभार्थी असेल, तर त्याविरोधात कारवाई अनिवार्य आहे.

सत्तेतील अधिकार आणि जबाबदारीवरही मत

बावनकुळे यांनी राज्य मंत्रिमंडळात होणाऱ्या संभाव्य बदलांवर भाष्य करताना सांगितले की, हे पूर्णपणे मुख्यमंत्री (Chief Minister) यांचा अधिकार आहे. शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या पक्षांतील बदलांचे निर्णयही संबंधित पक्ष प्रमुखच घेतील. मात्र मंत्रिमंडळातील सर्वांनी एकत्रित जबाबदारी स्वीकारून वागले पाहिजे, असे ते म्हणाले.

रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर अप्रत्यक्ष टोला मारताना बावनकुळे म्हणाले, “कोणाचाही फोन सहज टॅप करता येत नाही, त्यासाठी विशिष्ट औपचारिकता आवश्यक असते. केवळ मीडियात राहण्यासाठी फुसक्या आरोप करण्यात काही अर्थ नाही.”

ओबीसी समाजाच्या न्यायासाठी भाजपची भूमिका

काँग्रेस (Congress) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ओबीसी (OBC) समाजाचा अवमान केल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली. त्यांनी सांगितले की, ५० वर्षे सत्तेत राहूनही काँग्रेसने ओबीसींची जनगणना किंवा आयोगाला संविधानिक दर्जा दिला नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आयोगाला संविधानिक मान्यता दिली व समाजाच्या न्यायाच्या मागण्या पूर्ण केल्या, असं ते म्हणाले.

राज्यमंत्री अधिकारांसंदर्भात स्पष्टीकरण

बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की कॅबिनेटमधील राज्यमंत्र्यांना काही ठराविक अधिकार देण्याची प्रक्रिया सुरू आहे. महसूल विभागाच्या ३०००हून अधिक प्रकरणांची सुनावणी त्यांनी राज्यमंत्र्यांकडे सोपवली आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “जर तुमच्यात खरेच हिंमत असेल तर थेट नाव घ्या, आकडे फेकून काही होत नाही,” असे त्यांनी राऊतांना सुनावले.

राज्यभरात दिले गेलेले बोगस जन्म दाखले १५ ऑगस्टपूर्वी परत घेण्याचे आदेशही महसूलमंत्र्यांनी दिले असून संबंधित अधिकाऱ्यांना ही सूचना पोहचवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now