Share

ICC ने सेमी फायनल आणि फायनलसाठी नियम बदलले, पाऊस आला तर घेतला जाणार ‘हा’ मोठा निर्णय

team

icc change dls rule in world cup  | आयसीसीने टी २० वर्ल्डकप २०२२ च्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता उपांत्य आणि अंतिम सामन्यादरम्यान पाऊस किंवा इतर कारणांमुळे सामना थांबवले तर एक वेगळा निर्णय घेण्यात येणार आहे. दोन्ही संघ १०-१० षटके खेळतील तेव्हाच डकवर्थ लुईस नियमानुसार सामन्याचा निर्णय घेतला जाईल, असा नवीन नियम आयसीसीने बनवला आहे.

टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, पावसामुळे किमान ५-५ षटके दोन्ही संघांनी खेळले. त्यानंतर पावसामुळे खेळ विस्कळीत झाल्यानंतरच डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे निर्णय घेतला जात होता. पण आता टी २० वर्ल्डकप उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

पावसामुळे, नियोजित तारखेला उपांत्य फेरी किंवा अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये किमान १०-१० षटकांचा खेळ न झाल्यास, राखीव दिवसाचा वापर केला जाईल. तसेच उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसामुळे राखीव दिवशीही निकाल लागला नाही, तर गटात अव्वल स्थानी असलेला संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

अंतिम सामन्यात जर पाऊस आला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि श्रीलंका संयुक्त विजेते होते. दरम्यान, टी २० विश्वचषक २०२२ चा पहिला उपांत्य सामना ९ नोव्हेंबर रोजी सिडनी येथे खेळवला जाणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना अॅडलेड ओव्हलवर १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर अंतिम सामना ११ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे.

सध्याच्या टी २० वर्ल्डकपमधील काही सामने पावसामुळे थांबवण्यात आले होते. तर काही सामन्यांचा निर्णय डकवर्थ लुईसच्या नियमानुसार घेण्यात आला होता. त्यामुळे सामन्यांचे समीकरण बिघडत आहे. आतापर्यंत एकूण चार सामन्यांदरम्यान पाऊस आला होता. जिथे २८ ऑक्टोबरला आयर्लंड-अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता.

त्याआधी दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड-अफगाणिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे अनिर्णित राहिला होता. एवढेच नाही तर आयर्लंड आणि इंग्लंडच्या सामन्यात डकवर्थ लुईसचा नियम लावण्यात आला आणि आयर्लंडने इंग्लंडचा पराभव केला होता. त्या सामन्यात पाऊस पडला नसता, तर इंग्लंडने सामना सहज जिंकला असता.

महत्वाच्या बातम्या-
Liton Das : भगवान कृष्णाचा कट्टर भक्त आहे ‘हा’ बांगलादेशी खेळाडू, भारताविरुद्ध केली होती धडाकेबाज फलंदाजी
अबब..! भाईंदरच्या मच्छीमारांच्या गळाला लागला ‘वाघ्या पाकट’ मासा; फोटो पाहून व्हाल थक्क
Taxi: ..अन् चालत्या टॅक्सीतच महिलेने दिला बाळाला जन्म, जॅकेटमध्ये बाळाला गुंडाळून पोहोचली हॉस्पिटलमध्ये

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now