Share

बहिणीच्या निधनानंतर भावूक झाला ‘हा’ आयपीएल खेळाडू, म्हणाला, ‘मला नेहमी तुझी आठवण येत राहील’

IPL 2021 मध्ये पर्पल कॅप जिंकणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीने नुकतेच निधन झाले. आपल्या बहिणीच्या अंत्यसंस्कारानंतर त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हर्षलच्या बहिणीचे नुकतेच निधन झाले. निधनाची बातमी ऐकल्यानंतर हर्षल पटेल सामना संपल्यानंतर लगेच एक दिवसासाठी त्याच्या घरी गेला होता. बहिणीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिल्यानंतर हर्षलला क्वारंटाईनमुळे तीन दिवस बायो-बबलपासून दूर राहावे लागले.

मात्र, त्यानंतर तो पुन्हा संघात सामील झाला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातही तो संघाचा भाग होता. सध्या त्याची बहिणीसाठीची जी पोस्ट व्हायरल होत आहे, त्यात बहिणीविषयी तो प्रचंड भावनिक झालेला दिसत आहे. त्याच्या पोस्टला चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या असून, त्याच्या दुःखात सगळे सामील झाले आहेत.

हर्षलने आपल्या बहिणीसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, ‘तू एक दयाळू आणि आनंदी व्यक्ती होतीस. तु तुझ्या आयुष्यातील अडचणींना हसतमुखाने सामोरे गेली आणि शेवटच्या श्वासापर्यंत तू हसरा चेहरा ठेवला. भारतात येण्यापूर्वी मी तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा तू मला सांगितले होते की, माझी काळजी करू नको, खेळावर लक्ष केंद्रित कर.’

‘तुझ्या बोलण्यामुळे मी शेवटच्या सामन्यात मैदानावर खेळण्याचे धैर्य वाढवू शकलो. आता मी तुझा सन्मान करण्यासाठी एवढेच करू शकतो. तुला माझा अभिमान वाटेल ते मी करेन. मला नेहमीच तुझी आठवण येईल, मी तुझी खूप आठवण काढत आहे. I Love you so much, Rest in Peace Jadi.’

हर्षल आयपीएल 2021 मध्ये 32 विकेट्ससह पर्पल कॅप विजेता होता. मात्र, या मोसमात आतापर्यंत त्याने पाच सामन्यांत केवळ सहा विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी RCB ने IPL लिलावात हर्षलला तब्बल 10 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

खेळ इतर

Join WhatsApp

Join Now