शिवसेनेचे साताऱ्याचे शिलेदार शंभूराज देसाई यांना शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे साताऱ्यात आनंदोत्सव साजरा होत आहे. शंभूराज देसाई यांच्या कुटुंबीयांनी पण त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याचा आनंद माध्यमांसमोर व्यक्त केला आहे. (minister Shambhuraj Desai’s mother told this special story)
शंभुराजे देसाई यांच्या आई याप्रसंगी म्हणाल्या की, ‘शंभूराज कॅबिनेट मंत्री झाला. याचा मला खूप आनंद आहे. तीन पिढ्यांनंतर आमच्या घरात हे मंत्री पद आलं. खरंतर शंभूचा जीवन संघर्ष खडतर आहे.’
पुढे त्या म्हणाल्या की, ‘मी त्याला कलेक्टर करणार होते. पण दुर्दैव आणि तो राजकारणात आला. पण त्याने त्याच चीज केलं, अशी प्रांजळ प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांच्या आई विजयादेवी यांनी दिली आहे.’
‘दोन्ही भावांचं राजकारणात चांगलं चाललं आहे. त्या संघर्षातून त्याला(शंभूराज देसाई) मंत्रिपद मिळाले आहे. ही खूप मोठी उडी होती. आम्हाला घरात भीती वाटत होती. पण ईश्वर कृपेने सगळं चांगलं झालं, असंही त्या म्हणाल्या.’
त्यानंतर शंभूराज देसाई यांचे बंधू रविराज देसाई यांनी पण आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘महिनाभर अनिश्चिततेची परिस्थिती होती. नक्की काय होईल पुढे असे वाटले? तरी साहेबांना मात्र सन्मानाचे स्थान मिळेल असे पक्के वाटत होते.’
‘लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यानंतर आता दुसऱ्यांदा आमच्या घराला कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. लोकनेत्याला साजेस काम त्यांच्या हातून होईल. साहेबांना चांगलेच खाते मिळेल. साहेब पालकमंत्री व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत शंभूराज देसाई यांच्या भावाने ही प्रतिक्रिया दिली.
महत्वाच्या बातम्या-
Tattoo: प्रमोशन पाहिजे असेल तर चांगला ब्लाऊज घाल आणि.., महिला कर्मचाऱ्याचा बॉसवर आरोप
Boss: जगातील सर्वात उदार बॉस, प्रत्येक कर्मचाऱ्याला ६३ लाख पगार, कुठूनही काम करण्याचे स्वातंत्र्य
NCP : जनता आक्रोश करेल म्हणून नाईलाजाने.., मंत्रिमंडळ विस्तार होताच राष्ट्रवादीचा शिंदे सरकारवर आरोप