या वेबसिरिजमध्ये प्राजक्ता माळीने महत्वाची भूमिका साकारली आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या वेब सिरीजमध्ये प्राजक्ता माळीला तेजस्विनी पंडित साथ देताना दिसून येत आहे. या सिरीजमध्ये दोघींनीही अतिशय बोल्ड सीन्स दिले आहे. यावरुन अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केलं आहे.
तसेच आता ८ भागांच्या या वेबसिरीजपैकी ६ भाग रिलीज झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा रानबाजार या वेबसीरीजा टीझर रिलीज झाला होता. त्यात प्राजक्ता माळीचा बोल्ड लूक पाहून प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
अशातच प्राजक्ताणे एका मराठी वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली आहे. यावेळी बोलताना तिने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. तिने यावेळी बोलताना एक अनुभव सांगितला आहे. ती म्हणतीये, ‘जेव्हा वजन वाढवायचं होतं तेव्हा मी शरिराला इतक्या सवयी लावून ठेवल्या होत्या की, नंतर माझं शरीर जास्त अन्न घेत नव्हतं.’
दरम्यान, पुढे बोलताना प्राजक्ताने सांगितलं की, ‘मला लूसमोशन झाले, उलट्या झाल्या. कारण मी एक्सेसीव्ह खात होते. जे शरीर स्वीकारत नव्हतं. होतं ते सगळं बाहेर पडत होतं. मग मला हळू-हळू सवय लावावी लागली, असं तिने सांगितलं आहे. मात्र हे ऐकून तिच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
तर दुसरीकडे नुकतीच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने तिच्या करिअरमधल्या बेस्ट सीन्स विषयी सांगितले आहे. प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे.
रानबाजारमधील फोट शेअर करत प्राजक्ताने लिहिले, ‘आणि जो scene माझ्या कारर्किदीतला one of the best scene आहे (अस फक्त मला नाही, अनेक जणांना वाटतय..) तो scene असलेला episode काल प्रदर्शित झाला… प्राजक्ताची पोस्ट व्हायरल होत आहे.
मोदी सरकार आवळा देऊन कोहळा काढते; ‘या’ नेत्याने मोदी सरकारचा खरा चेहरा आणला समोर
बायको आणि मुलीसमोर अभिषेक बच्चन दमेपर्यंत नाच नाच नाचला; व्हिडिओ पाहून चाहत्यांनी केलं कौतूक
विखे पाटलांचे नाक कापले! स्वत:च्या गावातच विरोधकांनी उडवला धुव्वा; १३/० ने केला सुपडा साफ
RCB कडून खेळताना 4 सामन्यांत बनवले 18 रन, इंग्लंडमध्ये जाताच पाडला धावांचा पाऊस