आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने(Rajasthan Royals) संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली आहे. या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सच्या या शानदार विजयात त्याची ताकद आहे ती गोलंदाजी. 29 वर्षीय अनुनय सिंग देखील या बॉलिंग लाइनअपचा एक भाग आहे. जे राजस्थान रॉयल्ससोबत काम करून स्वत:ला चांगले बनवत आहेत.(i-spent-many-nights-eating-only-milk-and-bread-but-did-not-tell-my-mother)
नुकतेच अनुनय सिंग(Anunay Singh) यांनी सांगितले आहे की, तो त्याच्या कठीण दिवसात दूध आणि ब्रेड खाऊन रात्र कशी घालवत असे आणि त्याने हे कधीही आईला सांगितले नाही. अनुनय सिंग एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि सतत त्याच्या संधीची वाट पाहत होता. या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सने मेगा लिलावात 20 लाख रुपये देऊन अनुनय सिंगला आपल्या संघाचा भाग बनवले आहे. त्यानंतर अनुनय सिंगमध्ये मोठा बदल झाला आहे.
आपल्या कठीण दिवसांची आठवण करून देताना अनुनय सिंग म्हणाले की, ‘मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. माझे वडील हे घरातील एकमेव कमावते सदस्य आहेत. पार्ट टाइम जॉब करायचा विचार खूप वेळा आला. बाकी काही नाही तर 7-8 हजार मिळतील. पण नंतर मला वाटले की काम केल्याने माझ्या सरावात खूप त्रास होईल.’
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘क्रिकेट(Cricket) हा महागडा खेळ आहे. मी माझ्या घरी याबद्दल कधीही बोललो नाही. माझे वरिष्ठ मला खेळण्यासाठी शूज द्यायचे. मी अनेक रात्री दूध आणि ब्रेड खाऊन काढल्या आहेत. ते भावूक झाले आणि म्हणाले, ‘आज रात्री मी उपाशीपोटी झोपलो असे जर मी माझ्या घरी सांगितले असते तर रात्रभर आईला झोप आली नसती’.
आपल्या कठीण दिवसांची आठवण करून देताना अनुनय सिंह म्हणाले की, ‘मला अनेकदा नाकारण्यात आले आहे. मी माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. इथेही चालणार नाही हे मला माहीत होतं. मी एमआरएफ आणि रेड बुलसाठी अनेक वेळा ट्रायल दिली आहे. मात्र प्रत्येक वेळी अपयश आले. यामुळे तो अनेकदा दु:ख्खी झाला आहे.
अनुनय सिंग यांनी ऑस्ट्रेलियाचा(Australia) वेगवान गोलंदाज ब्रेट लीकडून प्रेरणा घेऊन क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. सध्या अनुनय सिंग बिहारकडून खेळतात. या सीजनमध्ये अनुनय सिंगला अद्याप आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळालेली नाही. पण संघात राहून तो निश्चितच स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.