Share

धक्कादायक! ‘तुझ्या मुलीला माझ्या स्वाधीन कर नाहीतर…’ तरुणाची प्रेयसीच्या आईला धमकी

crime

हरियाणातील पानिपतमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. माथेफिरू प्रियकराने थेट प्रियसीच्या आईलाच धमकी दिल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हातात ॲसिड घेऊन त्याने मुलीवर फेकण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याला पोलिसांनी अटक केले आहे.

तर जाणून घेऊ या नक्की प्रकरण काय.. ही घटना पानिपत शहरातील शिवनगर येथील आहे. शनिवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास महिला आपल्या 20 वर्षीय मुलीसोबत काम करून घरी परतत होती. मात्र तेव्हा अचानक दोन मुलांनी रस्ता अडवला. मिळलेल्या माहितीनुसार, त्यापैकी एकाने डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क घातलेला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दुसरा आरोपी योगेश याने मास्क घातलेला नव्हता. योगेश हा यूपीतील सीतापूरचा रहिवासी आहे. ‘मला तुझी मुलगी आवडते आणि तिला माझ्याकडे सोपव. ती माझ्यासोबत राहील. जर तुम्ही तिला माझ्या ताब्यात दिले नाही तर मी तिच्यावर ॲसिड टाकेन. त्याच्या भावांनाही मारून टाकीन,’ अशी धमकी आरोपी योगेशने मुलीच्या आईला दिली.

मात्र मुलीला त्याच्याकडे सोपवण्यास आईने नकार दिला. आईने नकार दिल्याने आरोप योगेशमध्ये आणि मुलीच्या आईमध्ये बाचाबाची झाली. हा प्रकार पाहताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. लोकांनी 112 वर कॉल करून पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.

तर दुसरीकडे सोजत शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणाने अल्पवयीन मुलीला मैत्रीच्या नावाखाली बोलावून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. सध्या आरोपीवर गुन्हा दाखल करून बेड्या ठोकण्यात आल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अनेक फोन केल्यानंतर अल्पवयीन मुलगी त्याला भेटायला गेली. तेव्हा आरोपी तिला नदीजवळच्या निर्जन भागात घेऊन गेला, तिथे अल्पवयीन मुलीने विरोध केला, मात्र आरोपीने तिला आपल्या वासनेची शिकार बनवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांडाचा गुंता सुटेना, आणखी एका नवीन खुलाश्याने पोलिसही झाले हैराण
व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त अमृता फडणवीस यांची खास पोस्ट; म्हणाल्या, “तू माझ्या हृदयात, मनात, श्वासात…”
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सात वाहन एकमेकांना धडकली; चार जणांचा जागीच मृत्यू, वाचा अपघाताचा थरार
‘राऊत साहेब तुरुंगात अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे’, किरीट सोमय्यांचा पलटवार

क्राईम इतर

Join WhatsApp

Join Now