माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका रसिकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. संकर्षण कऱ्हाडे हा अभिनेता तुझी माझी रेशिमगाठ मालिकेमध्ये समीर नावाची व्यक्तिरेखा साकारतो. लोकांना त्याचे हे पात्र आवडताना दिसते आहे. या मालिकेतील समीर आणि शेफाली यांचा लव्हट्रॅक लोकांना फार आवडतो आहे. संकर्षणचा मोठा चाहता वर्ग महाराष्ट्रभरात आहे. (I have Sameer’s real life wife in your ‘Reshimgath’)
सध्या तुझी माझी रेशीमगाठ मालिकेत समीर आणि शेफालीचा लव्हट्रॅक चालू आहे. पण संकर्षणच्या खऱ्या आयुष्यातील शेफालीला तुम्ही पाहिलंत का? ती अतिशय सुंदर दिसते. संकर्षणचे अरेंज मॅरेज झाले असून त्याच्या पत्नीचे नाव शलाका असे आहे. तिच्यासमोर मोठ्या अभिनेत्री फिक्या पडतील एवढी सुंदर ती दिसते. परंतु लाईम लाईटपासून ती दूर असते.
आपली पत्नी शलाकासोबतचे अनेक फोटो संकर्षण कऱ्हाडे सतत इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. शलाकाला पेंटिंगची आवड असून ती पेंटिंगचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. त्या दोघांमध्ये सुंदर बॉडिंग आहे. मागील वर्षी ते दोघे आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलाचे नाव सर्वज्ञ आणि मुलीचे नाव स्त्रग्वी असे त्यांनी ठेवले आहे.
संकर्षण कऱ्हाडेने राम राम महाराष्ट्र तसेच एक कुकिंग शो आणि डान्सर धर्मेशच्या एका डान्सिंग शोचे सुत्रसंचालन केले आहे. त्याने लोभ असावा, मी रेवती देशपांडे या नाटकांमध्ये त्याने काम केलं आहे. त्याचं ‘तू म्हणशील तसं’ हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे. त्या नाटकाचे अनेक प्रयोग महाराष्ट्रभरात होत असून लोकांचा त्याला मोठा प्रतिसाद आहे.
संकर्षण कऱ्हाडेने मराठी इंडस्ट्रीत कामाला सुरुवात केल्यापासून अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. ‘फु बाई फु’ या विनोदी कार्यक्रमात त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. संकर्षण लोकांपर्यंत परभणीचा आवाज बनून पोहचला. तो चित्रपट, मालिका, नाटक या सर्व माध्यमांत उत्तम काम करतो आहे. झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमात २००८ ला तो दिसला होता. त्यानंतर माझिया प्रियाला प्रीत कळेना, आभास हा या मालिकांमध्ये त्याने काम केले आहे.
संकर्षणच्या विविधरंगी अभिनयाची जादू, त्याच्या सामाजिक भाष्य करणाऱ्या कविता, विनोदाचे टायमिंग या गोष्टींमुळे त्याला रसिकांनी भरपूर प्रेम दिले आणि त्यामुळेच सबंध महाराष्ट्रभरात संकर्षण कऱ्हाडेचा मोठा चाहता वर्ग आहे. केलेल्या कामाला लोकांचा चांगला प्रतिसाद कायम मिळणे ही एका कलाकारासाठी मोठी गोष्ट असते. रसिकांची अशी दाद संकर्षणला मिळणे त्याच्या अभिनय कारकिर्दीला उंचावणारे ठरेल.
महत्वाच्या बातम्या –
मी नाही, तर ‘हे’ आहे युझवेंंद्र चहलचे पहिले प्रेम; स्वत: धनश्री वर्मानेच केला मोठा खुलासा
मेकअपशिवाय ‘अशा’ दिसतात बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्री, मौनी रॉयला पाहून तर बसेल धक्का
पंकजा मुंडेंना मिळणार विधान परीषदेची आमदारकी; पुन्हा होणार राज्याच्या राजकारणात सक्रीय