सध्या महाराष्ट्रात देखील दाक्षिणात्य सिनेमांची आणि कलाकरांची क्रेझ आहे. अनेक दाक्षिणात्य अभिनेते आणि अभिनेत्री यांचे महाराष्ट्रात चाहते आहेत. असे असताना सध्या, तामिळ आणि मल्याळम सिनेमातील अभिनेता विनायकन याने ‘मी टू’ बाबत जे वक्तव्य केले आहे, यामुळे सोशल मीडियावर सध्या त्याची चर्चा होत आहे. त्याच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे.
विनायकन सध्या त्याच्या आगामी ‘ओरुथी’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात त्याला मी टू मोहिमेबद्दल प्रश्न विचारण्यात आले. याबद्दल त्याने जी उत्तरं दिली त्यावरून अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे.
त्याला ‘ओरुथी’ सिनेमाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात मी टू मोहिमेबद्दल विचारण्यात आले. यावर त्याने उत्तर दिले की, मला मी टू या मोहिमेबद्दल काहीही माहिती नाही. परंतु महिलांना सेक्ससाठी विचारणं म्हणजे ‘मी टू’ असेल, तर मी हे करत राहीन. त्याच्या या उत्तराने सर्वांना धक्का बसला.
तसेच म्हणाला, मी आतापर्यंत दहा महिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवले आहेत. हे संबंध ठेवण्याआधी त्या सर्व महिलांना माझ्याशी संबंध ठेवायला आवडतील का? असं विचारलं होतं मी अजूनही त्यांना याबाबत विचारेन, यालाच ‘मी टू’ असं म्हणतात का? असे तो म्हणाला.
विनायकन याच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकांना धक्का बसला. अनेकांनी त्याला ट्रोल केले. विनायकन यांनी याआधी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. याआधी दलित कार्यकर्त्या आणि माजी मॉडेल मृदुला देवी यांनी देखील त्याच्यावर अश्लिल आणि अपशब्द वापरल्याचा आरोप केला होता. यामुळे विनायकनला अटक देखील झाली होती.
विनायकन विरुद्ध आयपीसी कलम 509, 294(बी)आणि केरळ पोलीस कायद्याच्या कलम 120(ओ)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली होती. केरळ उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. आता त्याने पुन्हा एकदा केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटावर परिणाम होणार का पाहावे लागेल.