‘माझी संपत्ती मी कष्टाने कमावलीय; कोट्यावधींचे गिफ्ट घेणाऱ्या जॅकलीन फर्नांडिसचा ईडीसमोर दावा

नुकतेच सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव समोर आले आहे. पीएमएलए (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अँक्ट) द्वारे जॅकलिनचा ७.२७ कोटींचा निधी गुन्हा म्हणून जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी आता नवीन माहिती समोर येत आहे.

पीएमएलए द्वारे जॅकलिनचा ७.२७ कोटींचा निधी गुन्हा म्हणून जप्त करण्यात आला, या प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसने मंगळवारी पीएमएलएच्या न्याय अधिकार्‍यांना आपले म्हणणे नोंदवले आहे. अभिनेत्रीने निवेदनात म्हटले आहे की, माझ्या मुदत ठेवीचा कोणत्याही गुन्ह्याशी संबंध नाही.

जॅकलीन फर्नांडिसचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचवेळी ईडीने नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात या अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश होता. ज्या अंतर्गत जॅकलिन फर्नांडिसचा त्रास खूप वाढला आहे.

दरम्यान, जॅकलीन फर्नांडिसने तिच्या ७.२७ कोटी निधीशी संबंधित प्रकरणाबाबत पीएमएमएलच्या न्यायिक अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे नोंदवले आहे. माझ्या मुदत ठेवीचा कोणत्याही गुन्ह्याशी संबंध नाही, असे जॅकलिनने सांगितले.

माझ्याकडे असलेल्या सर्व ठेवी वैध आहेत, बऱ्याच वर्षांपासून या ठेवी माझ्याकडे आहेत. या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरला मी ओळखत नव्हते तेव्हापासून या ठेवी माझ्याकडे आहेत, हे मी माझ्या कष्टाने पैसे कमावले आहेत, अशी माहिती जॅकलीनने दिली.

मात्र, ईडीचे म्हणणे आहे की, सुकेश चंद्रशेखर खंडणीच्या धंद्यात सामील असल्याची माहिती जॅकलिनला होती. यापूर्वी सुकेशने जॅकलिनला १० कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याची माहिती ईडीला मिळाली होती. जॅकलिनची ईडीने यापूर्वी अनेकदा चौकशी केली आहे. सुकेशसोबतच्या संबंधांबाबत जॅकलिनची ईडीने चौकशी केली होती.