Share

Uddhav Thackeray : ठाकरेंविषयी सहानभूती वाटते, धनुष्यबाण गोठवल्यामुळे आम्हालाही दुख: झालय, पण..; बड्या भाजप नेत्याचे वक्तव्य

uddhav thackeray

Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गट आणि त्यांचा सहकारी पक्ष असलेला भाजपा हा ठाकरे गटाचा पराभव असल्याचे सांगत आहे. तर ठाकरे गटाने निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला.

सगळेच जण प्रतिक्रिया देत आहेत. परंतु काही जणांच्या प्रतिक्रिया चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. त्यात शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या प्रतिक्रियने चर्चेला उधाण आणले आहे. त्यांनी निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यामुळे दुख झाल्याचे सांगितले आहे.

त्यांनी आपल्याला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानभूती वाटत असल्याचे सांगितले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. ते लघुउद्योग संघटनाबरोबर बैठक करण्यासाठी आणि कौजागिरी पौर्णिमाच्या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते.

त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानभूती जरी दाखवली असली. तरी सोबतच त्यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. त्यांनी भाजपासाठी परिवार म्हणजे देश आहे, तर ठाकरेंसाठी देश म्हणजे परिवार आहे असा घणाघाती आरोप केला. त्यांनी उद्धव ठाकरेंना आपल्यात सुधारणा करण्याचा पण सल्ला दिला.

उद्धव यांनी सोनियाला तर आदित्य यांनी राहुलला वाकून नमस्कार घालणे पण आपल्याला आवडले नसल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. त्यांनी आपल्या आमदारांना जय सोनिया आणि जय शरद पवार म्हणायला लावले. त्यामुळेच शिवसेनेत फुट पडल्याचा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी फारकत घेतली. बाळासाहेब म्हणत होते की, मी माझा पक्ष बंद करेन पण कॉंग्रेस सोबत युती करणार नाही. पण उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय स्वर्थासाठी कॉंग्रेस सोबत युती केली.

महत्वाच्या बातम्या
Rekha : रेखाने केले धक्कादायक विधान म्हणाल्या, लग्नाच्या अगोदर शारीरीक संबंध असणे नैसर्गिक आहे पण…
Rekha : रेखा आणि अमिताभचा रोमान्स बघून प्रचंड संतापल्या होत्या जया बच्चन; जागच्या जागी घेतला ‘हा’ धाडसी निर्णय
Mulayam Singh Yadav: वडील मुलायमसिंगांनी दुसरे लग्न केल्याने भडकले होते अखिलेश यादव; शेवटी निघाला ‘हा’ तोडगा   

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now