Share

हिंदी चित्रपटात काम करून मला माझा वेळ नाही घालवायचा, साऊथ सुपरस्टारने स्पष्टच सांगितले

बॉलिवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्री हा किस्सा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. बॉलीवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्री या वादात आता साऊथचा सुपरस्टार महेश बाबू यानं उडी घेतली आहे. एका चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजदरम्यान महेश बाबूला या वादा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्याने जे उत्तर दिले ते प्रत्येकाच्या कल्पनेपलीकडचे होते.

अभिनेता महेश बाबू याचा 12 मे रोजी ‘सरकारू वारी पाता’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजदरम्यान त्यानं माध्यमांशी संपर्क साधला. यावेळी त्याला चालू असणाऱ्या बॉलीवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्री या वादाबाबत अनेक प्रश्न केले. यावर त्याने आपलं स्पष्ट मत व्यक्त केले.

बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार का असा प्रश्न महेश बाबूला यावेळी विचारण्यात आला. यावर त्याने उत्तर दिले की, हिंदी चित्रपटात काम करून मला माझा वेळ घालवायचा नाही. मला त्यात काम करणं परवडणार नाही, असे तो म्हणाला. महेश बाबूचे हे वक्तव्य येताच इंडस्ट्रीत खळबळ उडाली.

अलीकडेच त्यानं ओटीटी बाबत देखील वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की,  तो मोठ्या स्क्रीनसाठी आहे आणि तो डिजिटल म्हणजेच OTT वर येण्याचा कोणताही विचार करत नाही. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत महेशने बॉलिवूड डेब्यूबद्दल काही गोष्टी सांगितल्या. ‘बॉलिवूडला मी परवडणार नाही’, असे तो स्पष्टपणे म्हणाला.

वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनय करत असलेला महेश बाबू आज दक्षिण भारतातील प्रसिद्ध स्टार आहे. त्यांने कोणत्याही हिंदी चित्रपटात काम केले नसले तरी उत्तर भारतातही त्यांची फॅन फॉलोईंग खूप आहे. त्याचे डब केलेले चित्रपट मोठ्या उत्सुकतेने पाहिले जातात.

46 वर्षांच्या या सुपरस्टारने आतापर्यंतचे संपूर्ण आयुष्य साऊथ इंडस्ट्रीत घालवले आहे. फिबद्दल बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्ट्सनुसार महेश बाबूने अलीकडेच त्याची फि खूप वाढवली आहे. जिथे तो एका चित्रपटासाठी 55 कोटी घेत होता, आता तो एका चित्रपटासाठी 80 कोटी घेत आहे.

महेश बाबूने केलेल्या वक्तव्यावर आतापर्यंत बॉलिवूडमधून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र त्याच्या वक्तव्याने आता बॉलीवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्री हा वाद अधिक वाढला आहे. पुढे हा वाद कोणते वळण घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

इतर बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now