Share

मला विधानपरीषद नको, मुश्रीफांना पाडूनच आमदार होणार; घाटगेंनी थोपटले दंड

राज्यात काही दिवसांपासून सुरू झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. त्यानंतर आता मंत्रिपद आमदारकी वरून भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. हसन मुश्रीफ यांचा पराभव करूनच आमदार होणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कागल येथील शाहू सभागृहात आयोजित कार्यक्रमात समरजित घाटगे बोलत होते. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. म्हणाले, जनतेच्या विविध विकास कामांसाठीच मी मुंबईला खेटे मारले. तालुक्यातील विद्यमान संजय गांधी निराधार योजना समिती बरखास्त झाली आहे.

पण, लवकरच नवीन समिती अस्तित्वात येईल. गेल्या काही दिवसांत मुश्रीफ गटातून काही प्रवेश आमच्या गटात झाले आहेत. त्यांना आता दोन डोस दिले आहेत. आता तिसरा प्रवेश म्हणजे बुस्टर डोस असेल. त्याचे नावही लवकरच समजेल, असे घाटगे म्हणाले.

तसेच म्हणाले, शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आल्यामुळे मला मंत्रिपद, आमदारकी मिळण्याची चर्चा आहे. पण, मी राज्यपालांच्या कोट्यातून आमदार होणार नाही, हसन मुश्रीफ यांचा पराभव करूनच आमदार होणार, असा ठाम विश्वास समरजित घाटगे यांनी यावेळी व्यक्त केला.

काही लोक मेसेज पाठवितात की आपण मंत्रीपद, राज्यपाल कोट्यातून आमदारकी मागीतली पाहिजे. पण, मी स्पष्ट करतो. मी राज्यपालांच्या आशीर्वादाने आमदार होणार नाही. हसन मुश्रीफांना पाडूनच आमदार व्हायचे आहे, असे समरजित घाटगे म्हणाले.

तसेच म्हणाले, नगरपालिकेतील भ्रष्टाचार राज आपण सर्वजण मिळून कमी करणार आहोत. मी नव्हे तर आपण आमदार व्हायचे आहे. त्याशिवाय मी कुठे जात नाही. २०२४ मध्ये हसन मुश्रिफांना पाडून आपण सगळ्यांनी आमदार होऊन या मतदारसंघाचा कोंढाणा परत मिळवू असे घाटगे म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now