Share

‘या’ कारणामुळे मला माझी ब्रा धुवायला आवडत नाही’; सई ताम्हणकरच्या वक्तव्याने खळबळ

बोल्ड अँड ब्युटीफूल अशी मराठी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. सई नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. सध्या ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, तिने सोशल मीडियावर अर्तवस्त्रांबाबत शेअर केलेला एक व्हिडिओ आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

ताम्हणकर नेहमीच तिच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सई ताम्हणकरला नुकताच पार पडलेल्या आयफा २०२२ सोहळ्यात मीमी या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यामुळे ती चर्चेत आली होती. आता तिनं सोशल मीडियावर अर्तवस्त्रांबाबत एक व्हिडिओ टाकला आहे, त्यावरून ती सध्या चर्चेत आली आहे.

सईनं तिची मैत्रीण मालिनी अग्रवाल हिच्यासोबतचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. इन्स्टा रिल्स असलेला हा व्हिडिओ ब्रा संदर्भात आहे. ‘तुम्ही तुमच्या आवडत्या ब्रा का धुत नाहीत?’असा प्रश्न या व्हिडीओमध्ये लिहिला आहे, त्यावर सई आणि मालिनी मजेशीर उत्तर देतात.

एका डायलॉगवर सई आणि मालिनी लिप्सिंग करताना दिसतायत. ‘मला खूप छान वाटतं, खूप मजा येते,’असं दोघी बोलताना दिसत आहेत. सध्या त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांच्या भरपूर प्रतिक्रिया या व्हिडीओला मिळत आहेत.

https://www.instagram.com/reel/CeYbINLllVM/?utm_source=ig_web_copy_link

सई ताम्हणकरने मराठी चित्रपटासोबत हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. २००८ मध्ये आमिर खानच्या ‘गजनी’ चित्रपटात आणि सुभाष घईच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ चित्रपटात काम केले होते. ती मुख्य अभिनेत्री म्हणून अनेक नाटकांमध्ये दिसली. तिने अभिनय केलेल्या ‘अधा-अधुरा’ नाटकातील तिच्या दमदार अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.

आता अनेक मराठी अभिनेत्री विशिष्ट मुद्यावर आपले स्पष्ट मत मांडताना दिसत आहेत. मध्यंतरी अभिनेत्री हेमांगी कवीचा ब्रा न घातलेला टी शर्ट वरचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. तिला अनेकांनी ट्रोल केले. त्यानंतर तिने ब्रा घालायची की नाही याबद्दल आपले मत मांडले होते. ते प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आलं होतं.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now