Share

मी पैसे देऊ शकलो नाही म्हणून मला भाजपने तिकीट दिले नाही; माजी मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप

laxmikant parsekar and pm modi

पुढील महिन्यात गोवा राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने एकूण ३४ उमेदवारांची यादी काल जाहीर केली आहे. या यादीत गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना डावलण्यात आलं आहे. या प्रकरणात आज लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

‘पैसे देऊ शकलो नाही म्हणून कदाचित तिकीट मिळालं नाही’, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांनी भाजपवर केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्य्स्फोट केलेला आहे. “पैसे देऊ शकलो नाही म्हणून कदाचित मला तिकीट मिळालं नाही. ५ वर्षे मी पक्षाशी जोडलेला असलो तरी संबंध टिकून ठेवणं कठीण आहे”, असे भाजप पक्षावर आरोप करताना पार्सेकर म्हणाले आहेत.

दिल्लीतील भाजपच्या प्रमुख नेत्यांवर माझा पूर्ण विश्वास होता. मात्र तरीही मला तिकीट मिळालं नाही. पार्सेकर योग्य उमेदवार नाहीत हे ‘या’ लोकांनी कसेतरी यशस्वीपणे दाखवून दिलं आहे. गेल्या पाच वर्षात जे काही घडले ते गोव्यातील भाजपच्या कोट्याही कार्यकर्त्यांना मान्य नाही जे पैसे कमवतात ते कदाचित पक्षाच्या काही नेत्यांना पाठवत असतील , असा गंभीर आरोप देखील माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांनी केला आहे.

माझ्यासारखे लोक इथे पैसे कमवण्यासाठी आले नाही, त्यामुळे पैसे देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. भाजपला एक ‘धोंड’ संपवत आहे, असे देखील लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले आहेत. भाजपचे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर मांद्रे मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. मांद्रे मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिली आहे.

मांद्रे मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी लक्ष्मीकांत पार्सेकर इच्छुक होते. पण भाजप पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभुपाऊस्कर हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मंत्री दीपक प्रभुपाऊस्कर सावर्डे मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. भाजपने त्या मतदारसंघात गणेश गावकर यांना उमेदवारी घोषित केली आहे.

भाजपच्या आणखी एक नेत्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. सांगे मतदारसंघातून सावित्री कवळेकर अपक्ष लढणार आहेत. सावित्री कवळेकर या गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी आहेत. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांना भाजपने केपे मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
ठरलं! उत्पल पर्रीकर पणजीतून अपक्ष लढणार; भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांनी उडाली खळबळ
माजी मुख्यमंत्र्यासहीत तीन बड्या नेत्यांची बंडखोरी; भाजपला भलेमोठे भगदाड
मनोहर पर्रीकरांच्या मुलाला भाजपने तिकीट का दिले नाही? गोव्याच्या मंत्र्याने केला मोठा खुलासा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now