Share

Samna: मी सामना वाचत नाही, मला त्याबद्दल काही माहिती नाही, अमृता फडणवीसांची जहरी टीका

amruta fadanvis and uddhav thackre

 

(Samna): सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे. शिवसेना खासदार संजय राऊत त्याचे संपादक आहेत. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ईडीने कारवाई केली. तेव्हापासून सामना या शिवसेनेच्या मुखपत्राचे कामकाज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पाहत आहेत. त्यातील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेनेकडून भाजप, बंडखोर आमदार यांच्यावर अनेक टीका केल्या जात आहेत.

टीका करण्यामागचे कारण हेच की, शिवसेनेतील एकनाथ शिंदेसह ४० आमदार व १२ खासदारांनी बंडखोरी केली. त्यांनतर भाजपसोबत सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार कोसळले. सरकार स्थापन झाल्यांनंतर तब्ब्ल ४० दिवसांनी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. आता खाते वाटप झाल्यानंतरही टीका सतत चालू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सामना मधील अग्रलेखातून मोदी सरकार, भाजप, बंडखोर आमदार यांच्यावर सतत टीका केली जात आहे. सामनातून केल्या जाणाऱ्या टीकेबद्दल अमृता फडणवीस यांना विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या की, “मी सामना वाचत नाही. मला त्याबद्दल काही माहिती नाही. सामनाचे विचार वेगवेगळे आहेत. त्यामुळे मला सामनापेक्षा लोकप्रतिनिधींचे विचार महत्वाचे वाटतात.”

पुढे त्या म्हणाल्या, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र राज्य थोडे मागे पडले आहे. नव्या सरकारला दुप्पट मेहनतीने काम करणे आवश्यक आहे. शिंदे-फडणवीस सरकारने आता अधिक ताकदीने आणि जोमाने राज्यकारभार करायला हवा. पायाभूत सुविधा आणि प्रोजेक्ट्स यावर भर देऊन नव्या सरकारला दुप्पट मेहनतीने काम करणे आवश्यक आहे.

अमृता यांनी महिलांना सांगितले की, मंत्रिमंडळात महिलांनाही स्थान असायला हवे. डिमांड करण्यापेक्षा कमांड असण्यावर भर द्यावा. महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्थान असायलाच हवे. महिलांनी मेहनत करून कमांड मिळवावी महिलांनी पुरुषांप्रमाणे अधिक मेहनत करून कमांड मिळवायला हवी. पुरुषांपेक्षा अधिक मेहनतीने महिला त्या स्थानी बसतील, तेव्हा तिला मिळणारा आदर मोठा असेल.

महत्वाच्या बातम्या
Aamir Khan: लालसिंग चड्ढाने वीकेंडला पकडला वेग, तरीही ५० कोटींपासून फारच लांब, वाचा आतापर्यंतची कमाई
Aamir Khan: ‘या’ ४ अभिनेत्रींनी दिला होता आमिर खानसोबत काम करण्यास नकार, वाचून आश्चर्य वाटेल
Abdul sattar : रस्त्यावरील खड्ड्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यु, ध्वजारोहन झाल्यानंतर शिवसैनिकांनी सत्तारांना अडवलं
Dhar: मोठी बातमी! धरण फुटल्याने २ गावे गेली पाण्याखाली, बचावकार्यासाठी २०० जवान रवाना

राजकारण ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now