Share

मला राग आला तर मी काहीही करू शकतो, मी आता गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार; खैरे संतापले

राज्यात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद प्रतिवाद सुरू आहेत. नुकतेच शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता, यावर आता औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

सध्या, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवा असे आव्हान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येते आहे. तर शिवसेनाप्रमुख हे राष्ट्रपुरुष असल्याने त्यांची प्रतिमा किंवा विचार यावर कुणा एका कुटुंबाची मक्तेदारी असू शकत नाही, असे प्रत्युत्तर त्याला शिंदे गटाकडून देण्यात येते आहे.

तर शिंदे गटावर सातत्याने गद्दार असल्याची टीका आदित्य ठाकरेंकडून आणि उद्धव ठाकरेंकडून करण्यात येते आहे. यावर गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आदित्य ठाकरे होऊ शकतात, त्यांच्या विचारांचे वारसदार होऊ शकत नाहीत.

त्यांनी बोलताना त्यांच्या वयाचा विचार करावा. आमच्या अनुभवाची विनाकारण खिल्ली उडवू नये. नाही तर आम्ही बोलण्यात कठीण आहोत, त्यांना आवरण अवघड होऊन जाईल, आदित्य ठाकरेंना आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

त्याचबरोबर गुवाहाटीला गेल्यावरचा एक अनुभवही पाटलांनी सांगितला होता. गुवाहाटीला गेल्यावर घरच्यांनी परत या परत या म्हणत फोन केले. पण आता आम्ही परत येत नाही, असं आम्ही ठणकावून सांगितलं. ज्याप्रमाणे अलिबाबा के चालिस चोर तसं आम्ही शिंदे बाबा के चालिस आमदार आहोत, असे पाटील म्हणाले होते.

यावर आता, चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला. म्हणाले, गुलाबराव पाटलांनी खोके मिळायला लागले की तो आदित्य ठाकरेंवर बोलतो. पण मी त्याची गोधडी काढल्याशिवाय राहणार नाही. मला राग आला तर मी काहीही करू शकतो, मी आता गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार, असे वक्तव्य खैरेंनी केले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now