Share

“मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलोय, ज्याला दाखवायचं त्याला वेळेला दाखवतो”

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईतील २२७ शाखाप्रमुख,नगरसेवक आमदार, विभागप्रमुख, खासदार उपस्थित असून, यांच्यामध्ये महत्वाची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या कि, माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा.

उद्धव ठाकरेआणि मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली होती. यावेळी, उद्धव ठाकरे यांनी विभागातील झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा असा पदाधिकाऱ्यांना आदेश दिला. मुंबई महापालिकेनं महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या सहकार्यानं नुकताच मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटाचा मालमत्ता कराचा निर्णय आपण घेतलाय तो जनतेपर्यंत पोहोचवा, असाही आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

यावेळी, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना आवर्जून सांगितले कि, मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेलो आहे. माझ्यावर अनेक वैयक्तिक टीका होत आहेत, मात्र या टिकेला मी शांतपणे घेत आहे. मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे, त्यामुळे ज्याला दाखवायचे त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो. तुम्ही येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा. मी वेळीच माझ्या कामाने माझी पोहोचपावती देतो. जनतेची कामं करा आणि जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे असा संकल्प करा.

यावेळी, पर्यांवरण मंत्री आदित्य ठाकरे देखील बैठकीला उपस्थित होते. त्यांनी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी होर्डिंग बॅनर लावण्यापेक्षा जनतेपर्यंत पोहोचणं गरजेच आहे, मोठी-मोठी बॅनर लावू नका. जनतेला ते आवडत नाही. अशा सूचना देत मार्गदर्शन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साडेदहा वाजता सुरू झालेली बैठक साडेअकराला संपली.

राज्यात सध्या शिवसेना-भाजप यांच्यात बिनसल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस- राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठी कसरत करावी लागणार आहे. मुबंई महापालिकेत शिवसेना सत्ताधारी आहे. हि सत्ता कायम टिकवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेनच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपने देखील मोहीम आखली आहे.

भाजपने कोअर कमिटीच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी आंदोलन, कार्यक्रम घेत लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनामुळे पुन्हा एकदा निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकांसाठीही राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

महत्वाच्या बातम्या
तरुणीने विमा एजंटला व्हिडिओ कॉल करून काढले सगळे कपडे; मग सुरु झाला भयंकर खेळ ..
गांधींना शिव्या देणाऱ्या कालिचरनला महाराष्ट्र शिकवणार धडा; महाराष्ट्र पोलीसांनी घेतला ताबा
त्यावेळी मला रस्त्यावरचे दगड चावून खावेसे वाटत होते; वाचा स्वत: सिंधूताईंनी सांगीतलेला दर्दनाक किस्सा

राजकारण

Join WhatsApp

Join Now