मंगळवारी पाकिस्तानमधील कराची भागात दहशतवादी हल्लेखोरांनी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात ३ चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, हा बॉम्बस्फोट एका आत्मघातकी हल्लेखोर महिलेने घडवून आणल्याचे आता उघडकीस आले आहे.
या महिलेच्या पतीने ट्विट करत, आपल्या पत्नीवर गर्व असल्याचे म्हटले आहे. तसेच “आपल्या दोन्ही मुलांना देखील तुझा अभिमान वाटेल” असेही हल्लेखोर महिलेच्या पतीने म्हटले आहे. या स्फोटाची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीने घेतली आहे. त्यांनीच या महिलेविषयी संपूर्ण माहिती दिली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव शारी बलूच असे आहे. ती नझर अबाद तुर्बत या भागातील रहिवासी आहे. ती एका माध्यमिक विद्यालयात विज्ञान विषय शिकवत होती. ज्यावेळी ती विद्यार्थी होती तेव्हाच ती बलूच विद्यार्थी संघटनेची सदस्य झाली होती. बलूच नरसंहार आणि बलुचिस्तानचा ताबा या घटनांची तिला जाणीव होती.
https://twitter.com/HabitanB/status/1519041873691791362
मुख्य म्हणजे, या महिलेचा चेहरा सर्वांसमोर आणण्याचे काम अफगाणिस्तानातील पत्रकार बशीर अहमद ग्वाख यांनी केले आहे. शारी बलूचचा पती एक डेंटिस्ट आहे. त्यांनी एक ट्विट करत, “शारी जान, तुझ्या या निःस्वार्थ कृत्यामुळे मी निशब्द झालो आहे. मात्र, मला तुझा अतिशय अभिमान वाटतो आहे.
माहरोच आणि मीर हसन या दोघांनाही तुझ्याबद्दल गर्व वाटतो. तू कायमच आमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राहशील.” असे आपल्या पत्नीविषयी म्हणले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पत्नीसोबत आणि मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे याबाबत बोलताना, “पत्नीविषयी अशा प्रकारची प्रतिक्रिया येणे हे बलुचिस्तान मधील युवा पिढीबाबत बरंच काही सांगून जातं” असे बशीर अहमद ग्वाख यांनी म्हणले आहे.
दरम्यान बशीर अहमद ग्वाख यांनी हल्लेखोर महिलेविषयी बरीच माहिती समोर आणली आहे. त्यांनी सांगितले आहे की, गेल्या दोन वर्षांपूर्वी ही महिला बलूच लिबरेशन आर्मीत सहभागी झाली होती. तिने स्वतःहून या आत्मघाती हल्ल्याचा पुढाकार घेतला होता. महत्त्वाचे म्हणजे या हल्ल्याच्या पूर्वी तिने “गूड बाय” असा मेसेज ट्विट केला होता.
महत्वाच्या बातम्या
VIDEO: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ठरली ओप्स मुव्हमेंटची शिकार, सर्वांसमोर खाली आला ड्रेस अन्…
या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर झाला बलात्काराचा आरोप; चित्रपटसृष्टीत खळबळ
महाराष्ट्राने इंधनावरील कर कमी करावा, पंतप्रधान मोदींनी ठाकरे सरकारला सुनावले
नवनीत राणांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे उघड, तरी त्यांना का वाचवलं जातय? आता भाजप गप्प का?