अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) व्हिडिओची सर्वात यशस्वी सीरीज ‘मिर्झापूर’मध्ये (Mirzapur) गोलू गुप्ताच्या भूमिकेने प्रेक्षकांमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. या सीरीजमध्ये गोलू गुप्ताची भूमिका अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने (Shweta Tripathi) साकारली आहे. आज श्वेताने जे काही मिळवले आहे तिथे पोहोचण्यासाठी तिने खूप मेहनत केली आहे. त्याचवेळी श्वेताच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.(hweta Tripathi buys Mercedes car)
श्वेताने अखेर तिचे एक मोठे स्वप्न पूर्ण केले आहे. तिने तिची ड्रीम कार म्हणजे मर्सिडीज ई-क्लास एक्सक्लुझिव्ह ई 220d खरेदी केली आहे. या कारची किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या कारची किंमत सुमारे 70.50 लाख आहे. अनेक चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तसेच इतक्या कमी वयात एवढे यश मिळाल्याबद्दल कौतुक होत आहे.
श्वेता त्रिपाठीने 2009 मध्ये ‘क्या मस्त है लाइफ’मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. श्वेता आपल्या करिअरमध्ये सतत प्रगती करत राहिली. ‘मसान’, ‘हरामखोर’, ‘गॉन केश’, ‘मिर्झापूर’, ‘द गॉन गेम’ ते ‘ये काली काली आँखे’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये काम करून तिने आपल्या अभिनयाचा जोर दाखवला आहे.
त्याचबरोबर श्वेता त्रिपाठीने तिच्या ड्रीम लिस्टमधील तिचे एक मोठे स्वप्न पूर्ण केले आहे. अलीकडेच एका सूत्राने श्वेताच्या ड्रीम लिस्टचा खुलासा केला. त्यांनी सांगितले होते की, ‘लो प्रोफाईल राहणे पसंत करणाऱ्या श्वेता त्रिपाठीने तिची ड्रीम कार मर्सिडीज आहे असे सांगितले होते. स्ट्रगलच्या दिवसांमध्ये श्वेता खासगी पूल कारमधून प्रवास करत होती. तिथून इथपर्यंतचा तिचा प्रवास खरोखरच अविश्वसनीय झाला आहे. तिला स्वतःच्या हिमतीवर पुढे जाताना पाहणे खरोखरच प्रेरणादायी आहे.
‘मिर्झापूर’ अभिनेत्री श्वेता त्रिपाठीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती लवकरच ‘द क्लीनिंग लेडी’वर आधारित प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. तिच्याकडे ‘मिर्झापूर 3’, ‘ये काली काली आंखे 2’, ‘गॉन गेम 2’, ‘एस्केप लाइव्ह’, ‘मख्खीचुझ’ आणि ‘एम फॉर माफिया’ इत्यादी प्रोजेक्टचा समावेश आहेत. ‘मिर्झापूर 3’ पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
महत्वाच्या बातम्या-
मिर्जापूरच्या गोलू गुप्ताने शर्टाची बटणे काढून केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून चाहते घायाळ
मिर्झापूरच्या डिम्पीने केली बोल्डनेसची हद्द पार, कोटचे बटण उघडून केले फोटोशूट; फोटो व्हायरल
चुकूनही घरच्यांसमोर बघू नका ही वेब सिरीज; बोल्डनेस आणि इंटिमेंट सीन्समुळे होईल तारांबळ
मैंने प्यार किया फेम भाग्यश्रीच्या मुलीचेही अभिनय क्षेत्रात पदार्पण; या सीरीजद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीला