अश्लील कृत्याला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केली आहे. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर तिचे म्हणणे ऐकून पोलीसही चकित झाले आहेत. आरोपी पत्नीने सांगितले की, तिचा पती मुलींसमोर अश्लील कृत्ये करायचा. यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती आणि डिप्रेशनमध्ये जगत होती.(husbands-wife-removes-thorn-sleeping-pills-mixed-with-vegetables-and-then-murderd)
हे प्रकरण भरतपूर(Bharatpur)च्या नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मृत जितेंद्र(Jitendra) (30) याचा दीपा(Deepa) (28) सोबत 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. जितेंद्र याचे गावातच फळांचे दुकान आहे. दोघांना दोन मुली आहेत. दीपाने सांगितले की, जितेंद्रला दारू पिण्याचे व्यसन होते. दीपाने सांगितले की तो तिला खूप मारायचा.
त्यानंतर तो तिचा शारीरिक छळ करत असे. तिने अनेकवेळा त्याला अडवले पण जितेंद्रने आपले कृत्य आवरले नाही. दीपाने पोलिसांना सांगितले की, तो कधी-कधी तिच्याशी अनैसर्गिक पद्धतीने संबंध निर्माण करत असे. दीपाने सांगितले की, 21 मार्चच्या रात्री जितेंद्र दारूच्या नशेत आला होता. घरी येताच मारहाण सुरू झाली. यानंतर तो घाणेरडे काम करू लागला. तिला हे सर्व सहन होत नव्हते.
सुरुवातीला तिने स्वतः मरण्याचा विचार केला, परंतु जेव्हा मुलींचा विचार मनात आला तेव्हा तिने आपला बेत बदलला. 21 मार्चच्या रात्री दीपाने जितेंद्रची हत्या केली. जितेंद्रने दीपाला मारहाण करून तिच्याशी गैरवर्तन केले, तेव्हा आपण आपल्या पतीची हत्या(Murder) करू, असा विचार तिने केला होता. प्लॅननुसार दीपाने जितेंद्रच्या भाजीमध्ये झोपेच्या चार गोळ्या मिसळल्या आणि खाऊ घातल्या.
रात्री जेवण करून जितेंद्र झोपला तेव्हा रात्री दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान तिला जाग आली. जितेंद्र गाढ झोपेत होता. दीपाने घरातील स्वयंपाकघरातून चाकू आणला. तिने आधी पतीचं तोंड आणि नाक दाबून, गळा दाबून हत्या केली. यानंतर चाकूने एकापाठोपाठ चार वार करून त्याचा खून केला.