एका नराधम पतीने स्वतःच्या पत्नीचाच मित्रांकडून सामूहिक बलात्कार करून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नराधम पती, तिच्यावर अनैसर्गिक सेक्स करून तिच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटके देत होता. एवढेच नाही तर मित्रांसमोर तिला पूर्ण उघडे करून तिच्याकडून न्यूड डान्स करून घेत असायचा. त्याच्या या अमानुष कृत्यांबद्दल ऐकल्यानंतर पोलीस देखील हादरून गेले.
मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये ही घटना घडली असून, पत्नीने असा आरोप आहे की, पती तिला फार्म हाऊसमध्ये मित्रांसमोर न्यूड डान्स करायला लावत असायचा. आरोपी पतीने मित्रांसोबत इंदूर येथील त्याच्या फार्म हाऊसवर तिच्यावर अनेकदा सामूहिक बलात्कार आणि अनैसर्गिक सेक्स करून तिचा छळ केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून इंदूर पोलिसांनी रविवारी वेगवेगळ्या ठिकाणांहून तिच्या पतीसह पाच जणांना अटक केली आहे.
इंदूर पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही महिला छत्तीसगडची रहिवासी आहे. ती सरकारी शिक्षिका आहे. मेट्रिमोनियल साइटवरून दोघांची ओळख झालेली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केले. पीडित महिलेने सांगितले की, लग्न समारंभात पतीच्या घरातून कोणीही आले नव्हते. लग्नासाठी तो एकटाच आला होता. आरोपी पती बिल्डर आहे. आरोपी आधीच विवाहित असल्याचे देखील तिने सांगितले.
पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 32 वर्षीय या महिलेने आरोप केला आहे की, नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2021 दरम्यान तिचा पती आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यावर इंदूर जिल्ह्याच्या क्षिप्रा पोलीस स्टेशन हद्दीतील एका फार्म हाऊसमध्ये अनेकदा सामूहिक बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केले.
महिलेने असाही आरोप केला आहे की गँगरेप दरम्यान तिच्या प्रायव्हेट पार्टवर जळत्या सिगारेटने चटके दिले आणि तिच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच, पीडित महिलेचे म्हणणे आहे की, जेव्हा ती आरोपीच्या तावडीतून कशीतरी सुटली आणि छत्तीसगडमध्ये तिच्या मामाच्या घरी पोहोचली तेव्हा त्यातील एकजण तिला मारण्याच्या उद्देशाने तिथे पोहोचला.
आरोपी पती आणि त्याचे मित्र मला मारण्याचा प्रयत्न करत होते, तसेच आरोपी पतीच्या फोनमध्ये तिचे अनेक अश्लील व्हिडिओ आहेत. अशी माहिती तिने पोलिसांना दिलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने नोंदवलेल्या एफआयआरवर तिच्या पतीसह अन्य चार जणांना मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
मीडियाशी बोलताना पीडित महिलेने सांगितले की, फार्म हाऊसमध्ये पूर्वी न्यूड पार्टी व्हायची. नवरा माझ्याकडूनही हे काम करून घ्यायचा. तो नोकरांपासून कपडे लपवायचा. मला नग्न राहण्यास भाग पाडले. येथे बाहेरूनही मुली येत असत. न्यूड डान्स केल्यानंतर सर्वजण माझ्यावर आलटून-पालटून बलात्कार करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे.
महत्वाच्या बातम्या
माझ्यावर आरोप करणारी महीला कलाकार भाजपशी संबंधीत; किरण मानेंनी उघड केले कनेक्शन
१२ आमदारांचा पत्ता कट?; काँग्रेसमध्ये उडाली खळबळ, सोनिया गांधींच्या प्लॅनने सगळ्यांनाच बसला धक्का
तुझ्यात अनेक दोष आहेत, पण…; विराटच्या राजीनाम्यानंतर अनुष्काची धक्कादायक पोस्ट