अलीकडे अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक अतिशय धक्कादायक नात्याला काळीमा फासणारी घटना दिल्लीत घडल्याचे उघडकीस आले आहे. पतीने खोटं बोलून आपल्या गर्भवती पत्नीला ट्रेनमधून बाहेर फेकल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली अजून जखमी गर्भवती महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस अधिक तपास करत असून काही दिवसांपूर्वीच या यांचा प्रेमविवाह झाल्याची माहिती मिळाली आहे.
तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय..? ही घटना आहे दिल्लीतील. नेहा असं या महिलेच नाव असून ज्ञानचंद शर्मा हे तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या लुधियाना परिसरात ती एका कम्पूटर इन्स्टीट्यूटमध्ये टीचर म्हणून काम करत होती.
आणि तिथेच ज्ञानचंद शर्मा नावाचा तरुण शिकायला यायचा. तिथच त्यांची ओळख झाली, अन् ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यातूनच त्यांच्या भेटीगाठी, गप्पा वाढू लागल्या. आणि त्यांनी पुढे आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेत. कोर्टात जाणून प्रेमविवाह केला. मात्र लग्नानंतर त्यांच्यात छोट्या-मोठ्या कारणांवरून खटके उडू लागले.
आणि या गोष्टीने पती हैरान झाला. एकेदिवशी लखनऊला घेऊन जातो असं सांगून पती तिला मनकापूर रेल्वेस्टेशनवर घेऊन आला. त्यानंतर त्याने चालत्या ट्रेनमध्ये नेहाचा गळा दाबला आणि बाहेर फेकलं. धक्कादायक बाब म्हणजे तेव्हा नेहा गर्भवती होती. त्याच गंभीर अवस्थेत रात्रभर ट्रॅकवर पडून होती.
सकाळी काही नागरिकांनी तिला अशा अवस्थेत पाहिलं, पोलिसांना या घटनेची माहिती दिली. नागरिकांनी नेहाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले. सासरची मंडळी मानसिक आणि शारीरीक छळ करत असल्याचा तिने आरोप केला.
तसेच मुलाला सुनेबद्दल वाईट गोष्टी सांगून भडकवायची. यानंतर पती आपल्याला मारहाण करत असल्याचं नेहाने म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे सासरच्या या त्रासाला कंटाळून तिने काही दिवसांपूर्वीच आत्महत्येचा दखील प्रयत्न केला होता. दरम्यान, नेहाच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी पती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘या’ आहेत जगातील ५ सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू, फोटो पाहून लागेल वेड
सलमान खानचा आणखी एक कांड उघड, कोर्टाच्या आदेशानंतर भाईजानच्या अडचणी वाढल्या
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा मुंबईच्या संघाला किती फायदा होणार? रोहित शर्माने केला मोठा खुलासा
चालत्या बसमध्ये बिअर पित होते विद्यार्थी-विद्यार्थीनी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश