जीवघेणी मिठी! छातीला स्फोटकं बांधून बायकोला मारली मिठी; कारण वाचून पायाखालची जमीन सरकेल

अनेकदा पती – पत्नीमधील वाद हे विकोपाला जातात, यातूनच धक्कादायक घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना गुजरातच्या अहमदाबाद येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. बायकोचा विरह सहन न होऊन पतीने तिला अशी जीवघेणी मिठी मारली की त्या स्फोटात दोघांचाही मृत्यू झाला. (husband strapped with explosives blows himself up with wife died in a blast)

आई – वडिलांचा मृत्यू झाल्याने मुलगा पोरका झाला आहे. मृत दांपत्याचं नाव लाला पागी आणि शारदा पागी असं आहे. गुजरातच्या अरावली जिल्ह्यातील ही घटना आहे. ४५ वर्षीय व्यक्ती लाला पागी याने हे जीवघेणं पाऊल उचललं. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास घेत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४५ दिवसांपूर्वी शारदानं नवऱ्याचं घर सोडलं. अहमदाबादपासून १३५ किमी अंतरावर असलेल्या तिच्या वडिलांच्या घरी म्हणजे माहेरी गेली. लाला ती परत यावी यासाठी तिच्या माहेरी जावून तिला समजावत होतामात्र, ती घरी यायला तयार नव्हती.

यातूनच पतीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास शारदाचा पती लाला पागी छातीला जिलेटिनच्या काड्या बांधल्या आणि तिच्या माहेरी तिला भेटायला आला. नवऱ्याला पाहताच शारदा त्याच्या जवळ आली आणि होत्याच नव्हत झालं.

शारदा बाहेर गेली असता त्याने तिची गळाभेट घेतली आणि मोठा स्फोट घडला. स्फोटाचा आवाज ऐकून घरातील सगळेच बाहेर आले. तेव्हा शारदा आणि तिच्या नवऱ्याच्या चिंधड्या उडल्या होत्या. त्यानंतर तात्काळ या दोघांनाही हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांनाही मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. तसेच शारदाचा भाऊ भवन म्हणाला की, माझ्या बहिणीली तिच्या नवऱ्याने आणि कुटुंबाने मानसिक आणि शारिरीक छळ केला. त्यामुळे ती या छळाला वैतागून माहेरी आली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
“आमचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, हिजाब आणि भगव्यावरुन…”, भारतीय जवानाचा शेवटचा मेसेज व्हायरल
असे शूट झाले ‘गेहराईंया’ चित्रपटातील इंटिमेट सीन्स, पहिल्यांदाच करण्यात आला ‘हा’ प्रयोग
तारक मेहता मालिका सोडल्यानंतर सोनू सध्या करत आहे ‘हे’ काम, फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक
परीक्षेत कॉपी केली म्हणून मैत्रिणींसमोर वडिलांनी झाप झाप झापलं; 13 वर्षीय मुलीने उचलले टोकाचे पाऊल..