‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण चांगलीच सर्वांना परिचित आहे. विदयेच माहेर घर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात प्रत्येक मिनिटाला काही ना काही नवीन घडत असतं. मात्र ही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इमारतीच्या सुपरवायझर सोबत भांडण न केल्यामुळे चिडलेल्या पतीने आपल्या पत्नीला चौथ्या मजल्यावरून ढकलले. (husband pushed his wife from the fourth floor)
ही धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात २५ वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे. पतीच्या या कृत्याने कोंढवापोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नितीन दसरथ दहिरे (वय ३२) याला पोलीसांनी अटक केली आहे. शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटणेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील एका निर्माणाधीन इमारतीत फिर्यादी या पतीसोबत राहतात.
याठिकाणी लाईट फिटिंग चे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नितीन दहिरे याचे लाईट फिटिंग करण्यासाठी आलेल्या सुपरवायझर सोबत भांडण झाले होते. त्यावेळी पत्नीने आपली बाजू घेत सुपरवायझर सोबत भांडण केले नसल्याचा राग त्याच्या मनात होता. याच कारणावरून त्यांच्यात शनिवारीही भांडण झाले.
दरम्यान, त्यानंतर नितीन दहिरे याने रागाच्या भरात फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर चौथ्या मजल्यावरून लिफ्टसाठी सोडलेल्या मोकळ्या जागेतून त्यांना खाली ढकलून दिले. या घटनेची अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
भाजपचे २५ आमदार करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, भाजप आमदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ
अर्ध्या तासात १० लाख गोळा करून सेल्समनची जिरवणारा तो शेतकरी कशाची शेती करतो?
व्वा रे पठ्ठ्या! ना घोडा, ना कार थेट JCB वरून नवरदेव घेऊन आला वरात; वाचा लग्नाची भन्नाट गोष्ट
लहान मुलांना मदत न केल्यानं नॅशनल क्रश रश्मिका ट्रोल; लोकं म्हणाली एवढे पैसे कमावून काय उपयोग