जळगाव जिल्ह्यात एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यात धक्कादायक माहिती उघड झाल्याने पोलिसांनाही जबर धक्का बसला आहे. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. (husband killed wife by hitting in head over suspicion of extramarital affair accused arrested)
या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हदारला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील सप्तश्रृंगीनगर येथे घडली आहे. आरोपी पती संजय महाजन याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात लाकडी पाटीने वार करून पत्नीची हत्या केली आहे. या प्रकणी आरोपी पतीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिता महाजन (46 वर्ष) असे मृत महिलेच नाव आहे. तर संजय महाजन असे आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सुनिता यांचा मुलगा दुपारी कामावरुन घरी आला तेव्हा घराचा दरवाजा बाहेरुन बंद होता. सुनिता यांच्या मुलाने घरात प्रवेश केला.
घरात पाऊल ठेवताच मुलाला जबर धक्का बसला. सुनिता या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसून आल्या. हे पाहताच मुलाने आरडा-ओरड सुरू केला. मुलाचा आवाज कानी ऐताच शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. त्यानंतर नातेवाइकांनी या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली.
तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सुनीता यांना तोपर्यंत मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. याच दरम्यान महिलेची हत्या करुन घराला बाहेरुन कुलूप लावून पळणारा व्यक्ती हा महिलेच्या परिचयाचा किंवा घरातील व्यक्ती असावा असा संशय पोलिसांना आला.
आणि तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी पती संजय महाजन याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या डोक्यात लाकडी पाटीने वार करून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे. तसेचह या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शाहरूखचा बहुचर्चित पठाण ‘या’ दिवशी होणार रिलीज, टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
त्याला मी रंगेहाथ पकडले होते तरी मी..; दीपिकाने सांगितला बॉयफ्रेंड रणबीरचा ‘तो’ किस्सा
बाईंना सलाम! होमवर्क केला नाही म्हणून चिमुकल्या विद्यार्थिनीला दिली ‘गोड शिक्षा’, व्हिडिओ तूफान व्हायरल
“…म्हणून मी अजूनपर्यंत लग्न केलेले नाही”; ‘बाहुबली’ फेम प्रभासचा मोठा खुलासा