नवरा – बायको हे नातंच असं खास आहे की, या नात्यात वादही होतात आणि मिटवलेही जातात. छोट्या – छोट्या कारणांवरून नवरा – बायकोच्या नात्यात खटके उडत असतात. मात्र कधी कधी ही भांडणे एवढी टोकाला जातात की, अनेकदा यातून धक्कादायक घटना देखील घडतात.
अशीच एक घटना आता समोर आली आहे. बायको रात्रीच स्वत:जवळ झोपू देत नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या भयानक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पतीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जाणून घ्या नेमकं घडलं काय?
ही धक्कादायक घटना मुंबईच्या मालवणीतून समोर येत आहे. मुंबईतील मालवणीच्या यशोदिप को ऑप सोसायटी, अंदा कॉलनी गेट नं 8 येथे ही धक्कादायक घटना घडली. ज्ञानोबा बलाडे असे आरोपी पतीचे नाव आहे. बायको जवळ घेत नव्हती. याच रागातून पतीने टोकाचे पाऊल उचलले आहे.
या घटनेने कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. तर पतीला अटक करण्यात आली आहे. पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला आहे. त्याच झालं असं, शुक्रवारी रात्री ज्ञानोबा बलाडे हा पत्नीच्या शेजारी झोपायला गेला होता. मात्र पत्नीने जवळ येण्यास नकार दिला.
दरम्यान, पतीला याच गोष्टीचा राग त्याला अनावर झाला. यानंतर त्याने रागाच्या भरातदगडाचा पाटा पत्नीच्या डोक्यात घालून तिची हत्या केली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.
पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या तरी पतीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अशी माहिती सध्या मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अलीकडे हत्यांच प्रमाण अधिकच वाढलेलं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
पूजेसाठी अगरबत्ती पेटवताच गॅस सिलेंडरचा झाला स्फोट; धक्कादायक घटनेचे फोटो व्हायरल
विराटबद्दल प्रश्न विचारताच भडकला रोहित शर्मा, म्हणाला, त्याला फॉर्ममध्ये येण्यासाठी…
बाबा वेंगा यांची तिसरी भविष्यवाणी खरी ठरणार? ‘या’ देशामध्ये दिसले एलियन्स; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल