नवरा – बायकोचं नातं हे पवित्र मानलं जातं. विवाह ही प्रत्येक मुला – मुलीच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असते. हे नातं एकमेकांच्या विश्वासावर बांधलेलं असतं. मात्र अशा काही घटना घडतात की, काही पती – पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. काही नात्यांमध्ये तर हा वाद अगदी टोकाला जातो.
हे सांगण्याचं कारण म्हणजे, एक वेगळंच प्रकरण सध्या समोर आलं आहे. ऑफिसवरून आल्यावर पतीला बायको नेहमीच थकलेली दिसायची. यामुळे पतीचा बायकोवरील संशय वाढू लागला. त्यांनतर नवऱ्याने जे काही केल ते वाचून तुम्हाला तरी धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
खरं – खोटं करण्यासाठी पतीने थेट बायको नेमकं घरी करते काय? कुणासोबत वेळ घालवते, हे तपासण्यासाठी बायकोच्या अपरोक्ष पतीने घरात CCTV बसवले. हा प्रकार नेमका कुठला आहे? याबाबत माहिती मिळाली नाहीये. मात्र अखेर पतीला CCTV मधून दिसलं की आपली बायको दिवसभर घरात नेमकं करती काय? CCTV तील दृश्य पाहून पतीला धक्का बसला.
दरम्यान, रात्रभर बायकोला लहान मुलं झोपू देत नसल्याचं पाहायला मिळालं. रात्रभर झोप व्हायची नाहीच, याशिवाय सकाळी बायकोला लवकर उठावं लागत होतं. यामध्ये ती पूर्णपणे थकून जात असल्याचं नवऱ्याला पाहायला मिळालं.