उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी बाराबंकी येथे पोहोचले. त्यांची सभा चालू असताना सायंकाळी 6 च्या सुमारास तेथील शेतकऱ्यांनी शेकडो गायी, बैल, योगींच्या सभेपासून 500 मीटर अंतरावर शेतात सोडले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या संदर्भात व्हिडिओ व्हायरल झाला होता, यावर उत्तर प्रदेश सरकारने प्रतिक्रिया देत व्हिडिओ खरा नसल्याचं सांगितलं आहे.
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेच्या ठिकाणाजवळ बैलांना सोडण्यात आलेला व्हिडिओ खरा नाही, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. एसपी अनुराग वत्स यांनी सांगितले की, या प्रकरणाची एसडीएम आणि सीओ फतेहपूर यांनी चौकशी केली. यामध्ये सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ बनावट आहे. मुख्यमंत्री योगींच्या कार्यक्रमस्थळी अशी कोणतीही घटना घडलेली नाही. असे ते म्हणाले.
तसेच म्हणाले की, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं आहे की, गौरा सैलक येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा चालू आहे, त्याचवेळी सभेपासून थोड्या अंतरावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी सभेत बैलं सोडली. त्यामुळे तिथे एकच गोंधळ उडाला. मात्र चौकशीत हा व्हिडिओ खरा नसल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारच्या IPRD अंतर्गत तथ्य-तपासणी करणार्या ट्विटर हँडलद्वारे हे देखील स्पष्ट केले गेले आहे की, काही सोशल मीडिया खात्यांद्वारे, मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत बैलं सोडत असलेल्या शेतकऱ्यांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत, मात्र सभेच्या ठिकाणी अशी कोणतीही घटना घडली नाही.
बाराबंकी में योगी जी की रैली में किसानों ने उनका स्वागत सांडो और आवारा जानवरो को भेज कर किया pic.twitter.com/jDfOKad1xS
— احمد (@sharyk76) February 22, 2022
वास्तविक, 22 फेब्रुवारी 2022 रोजी सीएम योगींची बाराबंकीमध्ये रॅली होती. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला, जो योगींच्या सभेच्या आसपासचा असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेकडो गायी, बैल सोडून दिल्याचे सांगण्यात आले. हा व्हिडिओ पाहताच तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
https://twitter.com/Barabankipolice/status/1496183018473598976?t=iDFha19oaXpQGzQsbVHhPQ&s=19
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बोलले जात होते की, गौरा सैलक येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवडणूक प्रचार सभेच्या कार्यक्रमापूर्वी, समाजवादी पक्षाचे आमदार राजेश यादव यांनी सोशल मीडियावर रस्त्याच्या कडेला बसलेल्या भटक्या प्राण्यांचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
दरम्यान, भाजपचे उमेदवार करुणाशंकर शुक्ला म्हणाले की, काही भटकी जनावरं अनेकदा मोकळ्या मैदानात बसतात, या सपाच्या लोकांनी कट रचून व्हिडिओ बनवून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेश सरकारने व्हायरल व्हिडिओ खोटा असल्याचं सांगितलं पण, अजुनही यावर अनेकांना प्रश्न पडला आहे.