BJP : बारातमीत आपली सत्ता आणण्यासाठी कित्येक वर्षांपासून भाजपची धडपड सुरु आहे. कोणत्याही परिस्थितित भाजपला या लोकसभा मतदार संघात आपला उमेदवार निवडून आणायचा आहे. २०१४ मध्ये रासप नेते महादेव जानकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी तगडी टक्कर दिली होती.
ज्या मतदार संघात सुप्रिया सुळे ३ विजय मिळवत होत्या. त्याच मतदार संघात सुप्रिया सुळे यांना फक्त ६९ हजार मतांनी विजय मिळवता आला. गोपीनाथ मुंडे यांची रणनिती आणि पवारांना थेट भिडणाऱ्या जानकरांमुळे ते सर्व शक्य झालं होतं. त्यामुळे २०१४ मध्ये बारामतीला हादरा देखील बसला होता.
२०१९ च्या निवडणूकीतही अशीच टक्कर देण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा कांचन कुल या उमेदवार होत्या. आता तर २०२४ ची तयारी सुद्धा सुरु झाली. पण महादेव जानकरांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आपण स्वतंत्र लढत असल्याचे सांगितल्याचे स्पष्ट केले आहे.
महादेव जानकर स्वतंत्र लढत असतील, तर तो भाजपसाठी मोठा धक्का असू शकतो. त्यामुळे भाजपचे मिशन बारामतीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. महादेव जानकर यांच्या स्वतंत्र लढण्याने भाजपची अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे यंदाचे भाजपचे मिशन बारामती फेल ठरणार का? असा प्रश्न उपस्थित केल जात आहे.
गेल्या तीन निवडणूकांपासून भाजप बारामती लोकसभा मतदार संघ जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. पवारांचा गड काबीज करण्याचं लक्ष्यच भाजपने ठेवलं आहे. २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत याचा भाजपला खुप फायदा झाला होता. त्यामुळे महादेव जानकरांना मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती.
त्यामुळे लवकरच बारामतीत भाजपचा झेंडा फडकणार असं चित्र भाजपने निर्माण केलं होतं. पण आता महादेव जानकरांच्या स्वतंत्र लढण्याच्या घोषणेने एकच खळबळ उडाली आहे. कारण २०१४ मध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढताना महादेव जानकरांना मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती.
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळे यांना ५ लाख २१ हजार ५६२ मतं मिळाली होती. तर जानकरांना ४ लाख ५१ हजार ८४३ मतं मिळाली होती. त्यावेळी फक्त ६९ हजारांच्या मताधिक्काने खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. त्यावेळी जानकरांनी सुळेंना चांगलीच टक्कर दिली होती.
२०१४ ला गोपीनाथ मुंडे यांनी माळी, धनगर या समाजांच्या मतांचे चांगले समीकरण जुळवून आणले होते. त्यामुळे पवारांच्या बालेकिल्लातच महादेव जानकरांनी त्यांना हादरा दिला होता. त्यावेळी ते रासपच्या चिन्हावर लढले होते. पण ते जर कमळाच्या चिन्हावर लढले असते, तर ते जिंकले असते, असेही म्हटले जाते.
आता मात्र ते स्वतंत्रपणे निवडून लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का असणार आहे. तसेच या परिणाम सुप्रिया सुळे यांना मिळणाऱ्या धनगर समाजातील मतांवरही होणार आहे. त्यामुळे महादेव जानकरांरे स्वतंत्रपणे निवडणूक लढणे हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनाही धक्का देणारे आहे.
दुसरीकडे भाजपकडून मिशन बारामतीची तयारी जोरदार सुरु आहे. भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामतीचे प्लॅनिंग सुरु केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत दौंडची जागा भाजपने रासपसाठी सोडली होती. पण ऐनवेळी राहुल कुल यांनी फॉर्म भरला होता. त्यामुळे तो रागही जानकरांच्या मनात असल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
मुंबई विमानतळावर सापडलं १५ कोटींचे सोन्याचं घबाड, ATS च्या हाती लागली धक्कादायक माहिती
Asia Cup: पुरुषांना नाही जमलं ते महिलांनी करून दाखवलं; ७ व्या वेळी पटकावला आशिया कप, श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव
shinde group : शिंदे गटाला आता त्यांच्याच कार्यकर्त्यांनी घेरले; मंत्री गुलाबराव पाटलांना मिळाला घरचा आहेर