Share

‘मन उडू उडू झालं’ फेम ह्रता दुर्गुळेच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ दिवशी दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ

hruta durgule

सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे सीझन सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकतीच हिंदी सिनेसृष्टीत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट विवाहबंधनात अडकले आहेत. त्यानंतर मराठी सिनेसृष्टीतील कलाकार विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे पुढील महिन्यात लग्नगाठ बांधणार असल्याची नुकतीच घोषणा केली. तर आता आणखी एक जोडपे लग्नाच्या बेडीत अडकण्यास सज्ज आहेत. हे जोडपे म्हणजे अभिनेत्री ह्रता दुर्गुळे आणि प्रतीक शाह.

ह्रता आणि प्रतीकचा मागील वर्षी २४ डिसेंबर रोजी मुंबईतील एका भव्य हॉटेलमध्ये साखरपुडा समारंभ पार पडला होता. या समारंभाचे फोटो ह्रताने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करत ‘नव्या सुरुवातीची जादू’ असे कॅप्शनमध्ये म्हटले होते. यासोबतच ह्रताने कॅप्शनमध्ये #happilyengaged हे हॅशटॅगही वापरले होते.

ह्रताने ही घोषणा करताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. तर आता त्यांच्या लग्नाची तारीखही निश्चित करण्यात आली असून लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ह्रता आणि प्रतीकच्या लग्नाची त्यांच्या चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे.

समोर येत असलेल्या बातम्यानुसार ह्रता आणि प्रतीक १७ मे रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. मुंबईत त्यांचा हा विवाहसोहळा रंगणार असून त्यासाठी लग्नाची जोरदार तयारीही सुरु झाली आहे. अद्याप यासंदर्भात ह्रता किंवा प्रतीकने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. परंतु, त्या दोघांनीही त्यांच्या नियोजित मालिकांचे काम पुढे ढकलल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, स्टार प्रवाहवरील ‘दुर्वा’ ही हृताची पहिली मालिका होती. तिने या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पर्दापण केले. मात्र, झी युवावरील ‘फुलपाखरू’ या मालिकेने हृताला घराघरात नेऊन पोहोचवले. तिची ही मालिका खुप जास्त प्रसिद्ध झाली. मालिकांशिवाय ह्रताने नाटकांमध्ये काम केले आहे. ‘दादा एक गुड न्युज आहे’ या नाटकातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

https://www.instagram.com/p/CaXOeVdAr_6/

ह्रताचा होणारा नवरा प्रतीक शाह छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. तर ह्रताची होणारी सासू मुग्धा शाह या देखील अभिनेत्री आहेत. अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
माजी पती नागचैतन्याचे तीन टॅटू शरीरावर गोंदवल्याने समंथाला होतोय पश्चाताप? म्हणाली, कधीच..
आर माधवनच्या मुलाचं होतंय कौतुक, विदेशात उंचावली भारताची मान; केली ‘ही’ कौतुकास्पद कामगिरी
मृत्यूच्या वेळी गर्भवती होती ‘ही’ अभिनेत्री; अमिताभ बच्चनसोबत ‘या’ चित्रपटात केलं होतं काम

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now