सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री हृता दुगुर्ळेने अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर हृताचा मोठा चाहतावर्ग आहे. ह्रता आणि प्रतीकचा मागील वर्षी २४ डिसेंबर रोजी मुंबईतील एका भव्य हॉटेलमध्ये साखरपुडा समारंभ पार पडला होता. या समारंभाचे फोटो ह्रताने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करत ‘नव्या सुरुवातीची जादू’ असे कॅप्शनमध्ये म्हटले होते.
तर 18 मे रोजी हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह मुंबईत विवाहबंधनात अडकले. काही दिवसांपूर्वीच ह्रता दुर्गुळेनं सोशल मीडियाच्या माध्यामातून रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर प्रतीक आणि ह्रता सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसले.
अखेर ते आता लग्न बंधनात अडकले आहेत. लग्नानंतर हृता सध्या तुर्कीतील इस्तानबूल (Turkey Istanbul) येथे हनिमून सेलिब्रेट करत आहे. सोशल मिडियावर हृताने हनिमूनचे अनेक फोटो आतापर्यंत शेअर केले होते. विशेष बाब म्हणजे, तिच्या चाहत्यांना तिच्या फोटोमधून इस्तानबुलमधील निसर्ग सौंदर्य पाहायला मिळालं.
अशातच हृता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हृताच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एका वेगळ्या भूमिकेत हृता आता आपल्या भेटीला येत आहे. हृता दुर्गुळेचा बहुचर्चित ‘अनन्याया चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून आहे.
हृताच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. हा सिनेमा येत्या येत्या 22 जुलैला रिलीज होणार आहे. यासंबंधी हृता दुर्गुळेने एक पोस्ट लिहिली आहे. ‘आपणच शोधायचं असतं कवेत घेता येईल असं आपलं स्वतःचं आकाश!…. अनन्या…. शक्य आहे तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे,’ असं पोस्टमध्ये हृताने लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/CeIXJmlI4rd/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, स्टार प्रवाहवरील ‘दुर्वा’ ही हृताची पहिली मालिका होती. तिने या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पर्दापण केले. मात्र, झी युवावरील ‘फुलपाखरू’ या मालिकेने हृताला घराघरात नेऊन पोहोचवले. तिची ही मालिका खुप जास्त प्रसिद्ध झाली. मालिकांशिवाय ह्रताने नाटकांमध्ये काम केले आहे. ‘दादा एक गुड न्युज आहे’ या नाटकातून तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
महत्त्वाच्या बातम्या
नवाब मलिक मुसलमान आहेत म्हणून…; शरद पवार आणि मोदींच्या ‘त्या’ भेटीवरून ओवेसी भडकले
लघवी आणि सांडपाण्यापासून बनवलेल्या ‘या’ बीअरला जगभरातून आहे प्रचंड मागणी; फायदे ऐकून बसेल धक्का
२६ दिवस जेलमध्ये राहणाऱ्या आर्यनला ड्रग्ज प्रकरणातून मिळाली क्लीन चिट; आता नुकसान भरपाई सुद्धा मिळणार
मोदी करणार ‘गुजरात टायटन्स’ ला सपोर्ट? फायनलपूर्वी गुजरातमध्ये दाखल झाल्याने चर्चेला उधाण