ऋतिक रोशन पुन्हा दिसला त्याच्या कथित गर्लफ्रेंडसोबत, व्हायरल फोटोनंतर अफेअरच्या चर्चांना उधाण

बॉलिवूडमध्ये अफेयरच्या चर्चा सध्या नवीन नाहीत. अनेक कलाकारांनी एकमेकांना डेट देखील केले आहेत. काहींची प्रेम कथा ही लग्नात ही बदली आहे. तर काहींचे लग्न होऊन तुटले आहे. त्याचबरोबर लग्नानंतरच्या अफेयरची देखील चर्चा बॉलिवूडसाठी नवीन नाही. अशातच मागील काही वर्षांपूर्वी अभिनेता ऋतिक रोशन आणि पत्नी सुझान खानचा घटस्फोट झाला.

 

घटस्फोट घेताना सुझानने ऋतिककडून जवळजवळ ५०० कोटींचे पोटगी घेतली होती. मात्र घटस्फोट होऊनही ऋतिक आणि सुझान हे दोघे अजूनही खूप चांगले मित्र आहेत. मात्र आता ऋतिकचे सध्या एका व्यक्तीसोबत जोडले आहे. ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री आणि गायिका सबा आझाद होय. याआधीही दोघांना अनेकवेळा एकत्र पाहिले आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार, हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. मात्र या दोघांनीही याबद्दल अजूनही अधिकृतपणे माहिती दिली नाही. याच दरम्यान सबाचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सबा फक्त ऋतिकसोबत नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसत आहे. खरंतर हा फोटो रविवार म्हणजेच २० फेब्रुवारीचा आहे. जेव्हा सबा ऋतिकच्या कुटुंबासोबत रविवारचे जेवण घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली होती.

 

खरंतर हा ऋतिकचे काका राजेश रोशन यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत राजेश रोशनने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘आनंद आजूबाजूला आहे, विशेषत: रविवारी जेव्हा जेवणाची वेळ असते.’ या पोस्टवर कमेंट करताना ऋतिकने लिहिले की, ‘हाहाहा अगदी बरोबर काका आणि तुमच्यासोबत खूप मजा आली.’ इतकेच नव्हे तर या पोस्टवर कमेंट करत सबाने लिहिले की, ‘बेस्ट संडे.’

 

यावरून हे स्पष्ट झाले आहे की, सबाचे फक्त ऋतिकसोबतच नाही, तर त्याच्या कुटुंबाशीही चांगले बॉन्डिंग झाले आहे. इतकेच नव्हे तर याअगोदर ऋतिकची एक्स पत्नी सुझान खानने देखील सोशल मीडियावर सबाचे कौतुक केले होते. काही दिवसांपूर्वी सुझानने सबा चा परफॉर्म करतानाचा फोटो शेअर केला होता. या फोटो पोस्ट करत सुझानने तिचे कौतुक देखील केले होते.

 

सबाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने २००८ मध्ये ‘दिल कबाडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मागील वर्षी सबा ही नेटफ्लिक्सवरील ‘फिल्स लाइक इश्क’ या सीरिजमध्ये दिसली होती. त्याचबरोबर ‘रॉकेट बॉइज’ या वेब सीरिजमध्ये ही तिने काम केले आहे. त्याचबरोबर ऋतिक ‘विक्रम वेधा’ आणि ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे.