Share

ह्रतिक रोशन ‘या’ अभिनेत्रीसोबत थाटणार पुन्हा संसार? लवकरच सात फेरे घेत एकमेकांना देणार वचन

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्याच्या लव्ह लाईफमुळे सतत चर्चेत असतो. सध्या त्याचे नाव गायिका आणि अभिनेत्री सबा आझादसोबत जोडले जात आहे. अलीकडेच सबा आझाद (Saba Azad) रोशन फॅमिलीसोबत लंच एन्जॉय करताना दिसली. यादरम्यान एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.(Hrithik Roshan will be with Saba Azad)

यानंतर सोशल मीडियावर हृतिक आणि सबाच्या लग्नाची चर्चाही सुरू झाली. त्यांच्यातील वाढती जवळीक पाहून दोघेही लवकरच लग्न करू शकतात असा अंदाज चाहत्यांनी लावला होता. चाहत्यांच्या या अंदाजाला आता वास्तवाचे स्वरूप येणार असल्याचे दिसत आहे. होय, एका मीडिया रिपोर्टमध्ये हे समोर आले आहे की हृतिक रोशन त्याची नवीन मैत्रीण सबा आझादबद्दल खूप सीरियस आहे.

हृतिक रोशनच्या जवळच्या सूत्राने बॉलिवूडलाइफला माहिती दिली की हृतिक रोशन पुन्हा सेटल होण्याचा विचार करत आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘सबाबाबत हृतिक खूप सीरियस आहे आणि त्याला हे नाते पुढे न्यायचे आहे. तो लग्न करण्याचा विचार करत आहे. यापेक्षा जास्त अजून काही ठरवलं नाहीये. दोघेही खूप आनंदी आहेत आणि दोघेही आजकाल एकमेकांना अधिकाधिक जाणून घेण्यासाठी दर्जेदार वेळ घालवत आहेत.

हृतिकने अलीकडेच त्याचा खास मित्र फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नाला हजेरी लावली आणि तोही खूप खूश होता. हृतिकने मित्र फरहानच्या लग्नात खूप मौज-मस्ती करतानाचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाला आहे. हृतिकला आता त्याच्या आयुष्यातही असे खास नाते हवे आहे, आणि आता असे दिसते आहे की सबा त्याच्यासाठी ती खास व्यक्ती आहे.

हृतिक रोशन आणि सबा आझादच्या डिनर डेटचे फोटो समोर आल्यानंतर दोघांची भेट एका डेटिंग अॅपद्वारे झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. अलीकडेच हे समोर आले आहे की हृतिक आणि सबा यांच्यातील संभाषण डेटिंग अॅपच्या माध्यमातून नव्हे तर ट्विटरवरून सुरू झाले आहे. वास्तविक, सबा आझादने हृतिक रोशनच्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिली होती. यानंतर डीएममध्ये (मेसेज बॉक्स) दोघांमध्ये संवाद सुरू झाला.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हृतिक रोशन लवकरच बिग बजेट चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या यादीत विक्रम वेधा, फायटर आणि क्रिश 4 ची नावे समाविष्ट आहेत. फायटरबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच हृतिक आणि दीपिका पदुकोण पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे. त्याचबरोबर ‘विक्रम वेध’मध्ये हृतिक रोशनशिवाय सैफ अली खानही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
शशी कपूर यांचा जुना व्हिडीओ होतोय व्हायरल, पत्नीबद्दल म्हणाले असं काही की भावनिक झाले लोक
वारं पठ्ठ्या! मार्कशीटमधील एका गुणासाठी बोर्डाला खेचलं हायकोर्टात, तीन वर्षांनी आला हा निकाल
पावनखिंडचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, ७ दिवसांत तब्बल एवढे कोटी कमवत पाडला नोटांचा पाऊस
गुन्हा दाखल झाल्यावर वानखेडेंचा अनोखा युक्तिवाद; म्हणाले, मी अल्पवयीन होतो, आईने सही करायला सांगितली होती

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now