गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. आता या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण की, मंगळवारी हृतिक रोशन सबा आझादसोबत विमानतळावर हातात हात घालून जाताना दिसला आहे. यावेळी चक्क सबा आझाद लाजतानाही दिसून आली आहे.
सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील असून याठिकाणी हृतिक आणि सबा हातात हात घालत चालताना दिसले आहेत. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद खुलून आला आहे. विशेष म्हणजे, मीडियासमोर येताच सबा लाजली आहे. त्यामुळे हृतिक आणि सबाच्या नात्याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
हृतिक रोशनचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. तसेच त्याच्या आणि सबाच्या नात्याविषयी खिल्ली उडवली आहे. अनेकांनी तर लहान मुलींना तरी सोडायचे असे हृतिकला म्हटले आहे. त्याचबरोबर सबापेक्षा अभिनेत्री कंगना रणावत बरी होती असे हृतिकला सांगितले आहे.
मध्यंतरी हृतिक सबासोबत एका हॉटेलमध्ये डिनर वेळी दिसला होता. यानंतर या दोघांच्या नात्याविषयी अनेकांनी वेगवेगळे मत नोंदविले होते. तसेच लवकरच सबा आणि हृतिक विवाहबंधनात अडकतील अशी माहिती माध्यमांमधून समोर आली होती. परंतु तेव्हा या अफवांवर हृतिकने किंवा सबाने काहीच उत्तर दिले नव्हते.
परंतु आता हे दोघे एकत्र माध्यमासमोर आले आहे. त्यामुळे या दोघांनी आपले नातेसंबंधसमोर आणण्याचा निर्णय घेतला असावा असे म्हटले जात आहे. दरम्यान सबा आझाद एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. तीने सर्वप्रथम दिल कबड्डी या चित्रपटात काम केले. त्यानंतर २०११ मध्ये ति ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या चित्रपटात दिसली.
सबाने मोजून काही चित्रपटात काम केले असले तरी तिने आपल्या अभिनयातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ति हृतिक रोशनसोबत असलेल्या नातेसंबंधांमुळे चर्चेत आली आहे.
महत्वाच्या बातम्या
सईला मिळाला लाईफ पार्टनर? ‘या’ व्यक्तीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली, ‘साहेब दौलतराव सापडले’
ऑस्कर, ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला लता मंगेशकरांचा पडला विसर; संतापलेली कंगना म्हणाली, अशा पुरस्कारांचा..
मुंबईच्या संघात सगळ्यात घातक फलंदाजाची एन्ट्री, सलग दोन पराभवानंतर रोहितची मोठी खेळी
सई ताम्हणकरला मिळाला तिचा लाइफ पार्टनर? स्वतःच फोटो शेअर करत म्हणाली, ‘माझ्यामुळे…’