Share

बहुचर्चित ‘विक्रम वेधा’ चित्रपटातील सैफ अली खानचा फर्स्ट लुक आला समोर, ह्रतिक रोशन म्हणाला..

Saif Ali khan First Look

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा आगामी ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. ह्रतिक आणि सैफचे चाहते या चित्रपटासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान चित्रपटातील सैफ अली खानचा फर्स्ट लूक (Saif Ali khan First Look) रिलीज करण्यात आला आहे. ह्रतिक रोशनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर सैफ अली खानचा हा लूक शेअर केला आहे.

ह्रतिकने इन्स्टाग्राम हँडलवर सैफ अली खानचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फोटोत सैफ अली खान जीन्स आणि पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, दाढी-मिशा आणि डोळ्यांवर चश्मा अशा अंदाजात खूपच डॅशिंग दिसत आहे. त्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फोटो शेअर करत ह्रतिकने लिहिले की, ‘विक्रम… एक उत्कृष्ट अभिनेता आणि सहकलाकारसोबत काम करणे ज्याची मी कित्येक वर्षापासून कौतुक करत आहे, हे एक असे अनुभव आहे जे मी नेहमी जतन करून ठेवणार आहे. अधिक प्रतीक्षा करू शकत नाही’.

यापूर्वी ह्रतिक रोशनच्या वाढदिवशी ‘विक्रम वेधा’ चित्रपटातील ह्रतिकचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला होता. ह्रतिक रोशननेही त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटातील त्याचा हा लूक शेअर केला होता. त्याच्या या लूकचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले होते.

दरम्यान, ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट ‘विक्रम वेधा’चा रिमेक आहे. हा चित्रपट म्हणजे ‘विक्रम’ नावाच्या एका पोलिस अधिकाऱ्याची कथा आहे जो ‘वेधा’ नावाच्या एका कुख्यात गँगस्टरला मारण्याची योजना करतो. तमिळमधील चित्रपटात आर माधवन आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत होते.

तमिळमध्ये आर माधवनने विक्रम नावाच्या पोलिस अधिकाऱ्याची तर विजय सेतुपतीने एक कुख्यात गँगस्टरची भूमिका साकारली होती. तर आता हिंदीत रिमेक करण्यात येणाऱ्या चित्रपटात सैफ अली खान ‘विक्रम’ तर ह्रतिक रोशन ‘वेधा’ ही भूमिका साकारत आहे.

वाई नॉट स्टुडिओज आणि रिलायन्स एंटरटेनमेंटच्या सहयोगाने ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकची निर्मिती करण्यात येत आहे. तर ३० डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
मराठी चित्रपटाचा साऊथमध्ये डंका! बाहुबली प्रभासने केले ‘सरसेनापती हंबीरराव’चे कौतुक, म्हणाला..
‘कामाच्या बदल्यात मागितला सेक्शुअल फेवर’, उर्फी जावेदचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप
VIDEO: पंडितजी म्हणाले असं काही की खळखळून हसू लागली नवरी, निमुटपणे ऐकून घेत होता नवरदेव

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now