बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन नुकतीच काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका रेस्टॉरेंटच्या बाहेर दिसला होता. यावेळी त्याच्यासोबत एक मिस्ट्री गर्लसुद्धा दिसली होती. त्यावेळी या मिस्ट्री गर्लने मास्क घातला असल्याने तिची ओळख पटली नाही. पण ह्रतिक आणि ती हातात हात घालून जाताना दिसले (Hrithik Roshan And Saba Singh Grewal). यादरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
ह्रतिकचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या मनात असा प्रश्न उपस्थित झाला की, नेमकी ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? तर ह्रतिक रोशनसोबत दिसलेली ही मिस्ट्री गर्ल म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून सबा सिंह ग्रेवाल असल्याचे नंतर काही रिपोर्ट्सद्वारे समोर आले. तर कोण आहे ही सबा सिंह ग्रेवाल जाणून घेऊया.
सबा सिंह एक अभिनेत्री, थिएटर डायरेक्टर आणि म्यूजिशियन आहे. तिला प्रोफेशनली सबा आझाद या नावाने ओळखले जाते. दिल्लीत लहानाची मोठी झालेली सबा शिक्षणानंतर नाटकात काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१० साली तिने स्वतःची नाटक कंपनी सुरु केली. तिच्या या नाटक कंपनीचे नाव ‘द स्किन्स’ असे आहे.
बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्येही सबाने काम केले आहे. २००८ साली तिने ‘दिल कबड्डी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर ती ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’, ‘नौटंकी साला’ यासारख्या चित्रपटात दिसली होती. तसेच सबा कॅडबरी, मॅगी, टाटा स्काय, गूगल, वोडाफोन, सनसिल्क, पॉन्ड्स यासारख्या अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्येही दिसली आहे.
याशिवाय सबाने ‘फील्स लाईक इश्क’, ‘लेडिज रूम्स’ या वेबसीरीजमध्येही काम केले आहे. तर लवकरच ती ‘रॉकेट बॉईज’ नावाच्या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. दरम्यान, ह्रतिक रोशन सार्वजनिक ठिकाणी सबाचे हात पकडल्याचे दिसल्यानंतर सर्वांनाच याचे आश्चर्य वाटले. त्यानंतर दोघांच्या डेटिंगबाबतच्या चर्चा सुरु झाल्या. दोघांबाबत अनेक बातम्याही समोर आल्या.
सबा आणि ह्रतिकच्या डेटिंगच्या चर्चांदरम्यान काही लोक असा अंदाज व्यक्त करत आहेत की, ते दोघे व्यावसायिक कारणासाठी एकत्र आले असतील. तर काहींचे असे म्हणणे आहे की, कामाव्यतिरिक्तही त्यांच्यात अजून काहीतरी सुरु आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. दरम्यान, latestinbollywood च्या रिपोर्टनुसार सबा जवळपास ४ दक्षलक्ष संपत्तीची मालकीन आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
PHOTO: नवाजु्द्दीन सिद्दीकीच्या घरी अनोख्या अंदाजात पोहोचली कंगना, तिच्या ड्रेसची सगळीकडे चर्चा
सलमान खान लवकरच करणार लग्न, रिलेशनशिपबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला..
देवोलिना भट्टाचार्यने ऑनस्क्रीन दीरासोबत केला साखरपुडा; पहा फोटो