बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन नुकतीच काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका रेस्टॉरेंटच्या बाहेर एक मिस्ट्री गर्लसोबत दिसला (hrithik roshan and saba azad) होता. त्यावेळी या मिस्ट्री गर्लने मास्क घातला असल्याने तिची ओळख पटली नाही. पण ह्रतिक आणि ती हातात हात घालून जाताना दिसले. यादरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर ही मिस्ट्री गर्ल म्हणजे अभिनेत्री सबा सिंह ग्रेवाल उर्फ सबा आझाद असल्याचे समोर आले.
ह्रतिक रोशन आणि सबाचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांच्या डेटिंगबाबतच्या चर्चा सुरु झाल्या. दोघांबाबत अनेक बातम्याही समोर आल्या. या चर्चा ताज्या असतानाच ह्रतिक पुन्हा एकदा सबा आझादसोबत दिसला आहे. शुक्रवारी ते दोघे मुंबईच्या एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसून आले. यावेळीही ह्रतिक सबाचा हात पकडताना दिसून आला.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर ह्रतिक आणि सबाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, ह्रतिक आणि सबा एका रेस्टॉरंटमधून बाहेर आपल्या कारच्या दिशने जात आहेत. यावेळी तिथे उपस्थित फोटोग्राफर्स त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढत आहेत. यादरम्यान ह्रतिक सबाचा हात पकडतानाही या व्हिडिओत दिसत आहे.
ह्रतिक पुन्हा एकदा सबासोबत दिसल्याने आता त्यांच्या डेटिंगच्या चर्चांनी अधिक जोर धरला आहे. सध्या त्यांचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून दोघांच्या रिलेशनशीपबाबत अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. दरम्यान, ह्रतिक किंवा सबाने या चर्चांवर कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. तसेच यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
दरम्यान, सबा आझाद ही एक अभिनेत्री, थिएटर डायरेक्टर आणि म्यूजिशियनसुद्धा आहे. द स्किन्स नावाची तिची एक नाटक कंपनीसुद्धा आहे. तसेच दिल कबड्डी, नौटंकी साला, मुझसे फ्रेंडशिप करोगे यासारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. याशिवाय सबा कॅडबरी, मॅगी, टाटा स्काय, गूगल, वोडाफोन, सनसिल्क, पॉन्ड्स यासारख्या अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्येही दिसली आहे.
ह्रतिकच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास ह्रतिक सध्या त्याचा आगामी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात तो गँगस्टर वेधाची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खान यामध्ये पोलिस अधिकारी विक्रमची भूमिका साकारत आहे. याशिवाय ह्रतिक दीपिका पादुकोणसोबत ‘फायटर’ या चित्रपटातही दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘मी खोटा असतो तर एवढा खवून आन् उचकून लढलो नसतो भावानों’, किरण मानेंची आणखी एक पोस्ट चर्चेत
‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ फेम अभिनेत्री मृणाल दुसानिसने दिली गुड न्यूज; लवकरच घरी हलणार पाळणा
मराठमोळ्या अभिनेत्रीचा स्पेनमध्ये डंका; प्रभावशाली अभिनेत्रींच्या चर्चासत्रात झाली सहभागी, म्हणाली..