पंजाबी गायक आणि जगप्रसिद्ध रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) आता आपल्यात नाहीत. रविवारी मानसा जिल्ह्यातील सिद्धू मुसेवाला यांना ३० गोळ्या लागल्याने करोडो चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. सिद्धू मुसेवाला हे महिंद्राच्या थार वाहनाने प्रवास करत होते आणि अचानक एके-४७ आणि एके-९४ शस्त्रांसह त्यांच्या वाहनावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. कोणाला काही समजण्यापूर्वीच सिंगरचा जागीच मृत्यू झाला.(Sidhu Musewala, Gangwar, CCTV footage, Goldie Brar, Lawrence Bishnoi)
गाडीत सिद्धूसोबत आणखी दोन लोक होते. त्यापैकी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. ज्या ठिकाणी सिद्धू मूसेवाला यांच्यावर गोळीबार करण्यात आला ते ठिकाण त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. या निर्दयी हत्येमागे गैंगवारसह अनेक कारणे सांगितली जात आहेत. पंजाब सरकारलाही दोष दिला जात आहे. राजकारणही शिगेला पोहोचले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिद्धूच्या कारचा आधीपासून दोन वाहने पाठलाग करत असल्याचे समोर आले आहे. खून झाला तेव्हा तेथे एक प्रत्यक्षदर्शीही होता. या अंधाऱ्या संध्याकाळची संपूर्ण कहाणी त्यांनी सांगितली आहे.
सिद्धू मूसेवाला यांच्या थार एसयूव्हीवर ३० राउंड गोळ्या झाडण्यात आल्या. काही गोळ्या कारच्या पडद्याला छेदून समोरच्या घराच्या भिंतीत गेल्या. या रक्तरंजित खेळाच्या खुणा अजूनही गुन्ह्याच्या ठिकाणी भिंतींवर आहेत. रहिवासी भागात झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असतानाच नागरिकांमध्येही संतापाचे वातावरणही आहे. त्यांना एक चिंता आहे, एक असुरक्षितता आहे, एक भीती आहे. त्यामुळेच सिद्धूचे चाहते सोमवारी सकाळपासून मानसातील सिव्हिल हॉस्पिटलबाहेर न्यायाच्या मागणीसाठी ठाण मांडून आहेत.
सिद्धू मुसेवालावर हल्ला झाला तेव्हा या परिसरात राहणारा मेस्सीही घटनास्थळी उपस्थित होता. या गोळीबाराचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या मेस्सीने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, सिद्धूसोबत त्याच्या कारमध्ये आणखी दोन लोक बसले होते. गोळीबाराचा धुमाकूळ कमी होऊन मारेकरी पळून गेल्यावर आम्ही तिथे पोहोचलो. सिद्धूच्या शरीरात गोळ्या होत्या. तो श्वास घेत असल्याचे मी पाहिले. मी सिद्धूला गाडीतून बाहेर काढले आणि दुसऱ्या गाडीत बसवले. रुग्णालयात पाठवले. सिद्धू ज्याबाजुने कारमध्ये बसले होते त्या बाजूने हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या.
प्रत्यक्षदर्शी पुढे म्हणाला, संध्याकाळची वेळ होती. सगळं नॉर्मल चालू होतं. त्यानंतर अचानक गोळीबाराचा आवाज आला. सुमारे ३५ ते ४० राउंड गोळीबार झाला असेल. ज्या ठिकाणी मारेकऱ्यांनी गोळीबार केला, तिथे रस्त्याला वळण आहे. वळणावळणामुळे तेथे वाहनांचा वेग कमी होतो. याचाच फायदा हल्लेखोरांनी घेतला. गोळीबाराच्या वेळी तेथे असलेल्या घराच्या भिंतींना गोळ्या लागून मोठे खड्डे पडले आहेत यावरून गोळ्यांचा दाब किती आहे, याचा अंदाज लावता येतो.
कॅनडाचा गँगस्टर गोल्डी ब्रार आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी याने सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. सिद्धू मुसेवाला यांची हत्या गैंगवारचे परिणाम असल्याचे बोलले जात आहे. सिद्धू मुसेवाला हा पंजाबचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीचा निशाणा होता. गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवाला यांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली आहे. तर लॉरेन्स बिश्नोई या दिल्लीतील तिहार तुरुंग क्रमांक-८ च्या उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये कैद आहेत.
सिद्धू मुसेवाला यांच्या चाहत्यांच्या निशाण्यावर पंजाबचे भगवंत मान सरकारही आहे, कारण शनिवारीच सिद्धू मुसेवालाची सुरक्षा हटवण्यात आली होती. दरम्यान, रडणारी आई आणि खचलेल्या वडिलांनी पंजाब सरकारला पत्रही लिहिले आहे. या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत करावा, अशी मागणी होत आहे.
पंजाब सरकारनेही या प्रकरणात सीबीआय आणि एनआयएची मदत घ्यावी अशीही मागणी होत आहे. वडिलांनी हृदयस्पर्शी पत्रात लिहिले आहे की, पत्नी विचारत आहे की मुलगा घरी कधी येणार? आपल्या मुलाने पंजाबचे नाव संपूर्ण जगात उंचावल्याचेही त्यांनी लिहिले आहे. पण पंजाबच्या डीजीपींनी या हत्येला गैंगवार म्हटले आहे. यासाठी डीजीपींनी माफी मागावी, अशी त्यांची इच्छा आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवालाची गोळी मारुन हत्या
आकाश को कोई सीमा नहीं, सिद्धू के पास अब कोई काम नही अभिनेत्याने उडवली खिल्ली
नवज्योत सिद्धू जज असताना त्यांच्यासमोर कॉमेडी करायचे भगवंत माने, आता त्यांना हरवून होणार मुख्यमंत्री
अभिनेता दीप सिद्धूचा अपघात की हत्या? पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा दुआ