Share

IND Vs PAK : वर्ल्डकपचा भारत-पाकिस्तानचा सामना तुम्हीही पाहू शकता फुकटात, फक्त वापरा ‘ही’ भन्नाट ट्रिक

india vs pakistan

how to watch ind vs pak match free | आयसीसी टी २० विश्वचषकात आज म्हणजेच रविवारी महामुकाबला होणार आहे. भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा संघ असणार आहे. या दोन्ही संघांमधील हा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा पहिला सामना असेल.

दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेची सुरुवात विजयाने करायला आवडेल. हे दोन्ही संघ वर्षभरानंतर टी २० विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. गेल्या वेळी दुबईमध्ये शाहीन आफ्रिदीची धोकादायक गोलंदाजी आणि बाबर आझम-मोहम्मद रिझवानच्या स्फोटक खेळीमुळे पाकिस्तानने टीम इंडियाचा १० गडी राखून पराभव केला होता.

त्यावेळी विश्वचषकात भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही संघांची हेड टू हेड तुलना केली, तर भारत पाकिस्तानवर भारी पडत असल्याचे दिसून येते.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ११ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान भारताने आठ सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने केवळ तीन सामने जिंकले आहेत. टी २० विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर दोघांमध्ये सहा सामने झाले आहेत. यामध्ये भारताने पाच विजय मिळवले आहेत. पाकिस्तानचा फक्त १ वेळा विजय झाला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता आहे. नाणेफेक दुपारी १ वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे टी २० विश्वचषकाच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर देशातील इतर भाषांच्या कॉमेंट्रीसह भारत-पाकिस्तानचा सामना पाहू शकता.

तसेच तुम्हाला भारतातील डिस्ने प्लस हॉटस्टार ऍपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.

महत्वाच्या बातम्या-
Rohit sharma : भारताने पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जावं की नाही? रोहितने दोन शब्दांत संपवला विषय, म्हणाला..
shivsena : उद्धव ठाकरेंनी आखला मोठा गेमप्लॅन, एकनाथ शिंदेंच्या सर्वात जवळच्या आमदाराला देणार शह
Siddharth Jadhav : माझे बाबा प्लाझा चित्रपटागृहाबाहेर खाली पेपर टाकून…; आधीची परिस्थिती सांगताना ढसाढसा रडला सिद्धार्थ

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now