म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे अनेकांना सोप्पे वाटते. मात्र गुंतवणूक केल्यानंतर किती कर भरावा लागतो, यासंबंधीत प्रक्रिया काय असते हे कोणाला जास्त माहित नसते. यामुळे अनेकांचा मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. जर तुम्ही म्युच्युअल फंडमधील 65 टक्के रक्कम शेअरची बाजारात गुंतवणूक केली तर त्याला इक्विटी फंड असे म्हटले जाते.
याच्याउलट जर तुम्ही फंडमधील युनिट एका वर्षाच्या आत विकले तर मिळणाऱ्या परताव्याला अल्पकालीन भांडवली नफा म्हणजेच STCG असे म्हटले जाते. मुख्य म्हणजे या परताव्यावर 15 टक्के टॅक्स आणि 4 टक्के सेस लागतो. याचबरोबर, एका वर्षानंतर इक्विटी म्युच्युअल फंडच्या युनिट्सची विक्री केली तर त्याला दीर्घकालीन भांडवली नफा म्हणून संबोधले जाते.
यावेळीचा परतावा 10 टक्के टॅक्स आणि 4 टक्के सेस द्यावा लागतो. मात्र या सगळ्यात जर एका आर्थिक वर्षात गुंतवणुकदारांना एक लाख रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळाला तरच गुंतवणुकदाराला टॅक्स भरावा लागतो. परतावा जर एक लाखापेक्षा कमी असला तर टॅक्स भरावा लागत नाही. यासोबतच जर एखाद्या डेट फंडच्या युनिट्सची विक्री 3 वर्षापेक्षा कमी कालावधीत झाली तर अल्पकालीन भांडवली नफ्यावर टॅक्स चुकता करावा लागतो.
यामध्ये गुंतवणुकदाराला इंडक्सेशनचा फायदा होता. महागाई , आर्थिक स्थिती पाहून टॅक्समध्ये चढउतार होतात. यासोबतच गुंतवणुकदारांला हायब्रिड फंडावरील टॅक्सही कधी कधी भरावा लागतो. यात गुंतवणूकदाराने किती रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली आहे. त्यानुसार त्याच्याकडून टॅक्स आकारण्यात येतो. म्हणजेच की, गुंतवणूक 65 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास डेट फंडासारखा टॅक्स द्यावा लागतो.
विशेष म्हणजे, यापूर्वी कंपन्या गुंतवणुकदारांना मिळणाऱ्या लाभांशावर टॅक्स लावत नव्हत्या. २०२१ पासून बजेटमध्ये बदल झाल्यामुळे गुंतवणूकदाराना टॅक्स भरावा लागत आहे. २०२१ पासून गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न टॅक्समध्ये धरले जात आहे. याची तुलना करुन गुंतवणुकदाराकडून टॅक्स वसूल केला जात आहे.
अनेकवेळा या टॅक्सची माहिती गुंतवणुकदारांना माहित नसल्यामुळे त्यांच्याकडून अधिक टॅक्स वसूल होतो. कधी कधी तर यामध्ये त्यांची फसवणूक केली जाते. त्यामूळे याबाबत संपूर्ण माहिती गुंतवणुकदाराला असणे आवश्यक असते.
महत्वाच्या बातम्या
संजय दत्तची ‘ती’ धमकी अन् संजय नार्वेकराला मिळायला लागली सेटवर खुर्ची; वाचा नक्की काय घडलं होतं
“गनिमी काव्याने तुमची हत्या होऊ शकते”; कार्यकर्त्यांना अडवल्याने सोमय्यांचा गंभीर आरोप
“माझी हत्या करण्याचा कट, घातपात होणार हे पोलिसांनीच सांगितलं”
IPL सुरु होताच जिओने आणला जबरदस्त प्लॅन, आता फुकटात बघा संपूर्ण IPL