Share

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे किती चांगले? काँग्रेसने पुरावे देत केलं कौतूक

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन शहराच्या नामांतराच्या प्रस्तावाला मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या नामांतराला काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे किती चांगले याबद्दल सांगताना कौतूक केलं आहे.

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उद्धव ठाकरेंनी काल हे काम पार पाडल्यानंतर आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील दिला. यावर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांनी आपल्या प्रतिक्रिया देत ठाकरे याचं कौतूक केलं आहे.

काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आपलं मत व्यक्त केलं आहे. म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी त्यांना कामाचा अनुभव नसताना चांगलं काम झालं, चांगलं सहकार्य केलं. मुख्यमंत्री थांबणार नाहीत, उद्धव ठाकरे साहेबांनी थांबणं शिकलेलं नाही.

आपण चांगलं सहकार्य केलं तुम्ही यापुढे देखील सहकार्य कराल ही अपेक्षा आहे. मी देखील तुम्हाला पुढील काळात सहकार्य करेन असे केदार म्हणाले. दोन वर्ष मुख्यमंत्र्यांनी कोरोनाशी लढाई केली. कोरोनाच्या लढाईबद्दल उद्धव ठाकरेंचं न्यायालयांनी कौतुक केलं आहे. इतर राज्यांच्या जनतेला देखील उपाशी पाठवलं नाही असंही केदार म्हणाले.

उद्धव ठाकरे जीवनात कधी हारले नाहीत, हरणार नाहीत. त्यांच्यासोबत असं पहिल्यांदा घडलेलं नाही. कोरोना आणि सर्जिकल ही त्यांच्या जीवनातील दोन मोठी आव्हानं होती. स्पाईन सर्जरी झालेल्या व्यक्तीनं एका महिन्यात कामाला सुरुवात केली, कोणी असं केलं असतं असे केदार म्हणाले.

शहराच्या नामांतराबाबत बोलताना म्हणाले, नामांतराचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. छत्रपतींच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नचं नव्हता, आम्ही प्रस्तावाला पाठिंबा दिला. आशा आहे की, आता विधानभवनात आमदार मतदान करताना अंतरआत्म्याचा आवाज ऐकून मतदान करेल.

तसेच म्हणाले, महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर राग न करत काही पक्षांच्या लोकांची काँग्रेस बद्दल मंत्रिमंडळात नाराजी असेल तर आम्ही उद्धव ठाकरेंच्या सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याची खात्री देतो, असेही सुनील केदार काल माध्यमांशी बोलताना म्हणाले.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now