शुक्रवारी पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना, रशिया आणि यूक्रेनच्या युद्धामुळे जगभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ही वाढतील असा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता देशात 2018 ते 2021 या काळात प्रचंड महागाई वाढली असून गरिबांनी जगायचं कसं? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीविषयी लोकसभेत भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी सुप्रिया सुळेंनी रशिया-युक्रेनमधील युद्धाचाही परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असून देशातील जनतेलाही त्याचा फटका बसत आहेत. सध्या महागाई प्रचंड वाढली असून ही महागाई कमी करण्यात यावी. अशी मागणी लोकसभेत केली आहे.
त्याचबरोबर, गोडतेल 67 टक्क्यांनी, पामतेल 61 टक्क्यांनी वाढलंय, मूगडाळ 45, उडीदाची डाळ 54 आणि तूर डाळ 49 टक्क्यांनी महाग झालीय. आता, देशातील गरिबांनी जगायचं कसं? असा प्रश्न त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत विचारला आहे. पुढे त्या म्हणाल्या, देशातील बहुतांश राज्य आर्थिक बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत.
त्यातच जीएसटीचा पैसाही राज्यांना वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे, राज्य सरकारला मदत करा, देशातील वाढलेली महागाई कमी करा, वस्तूंच्या किंमती कमी करा. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मागणीला आघाडीच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच केंद्राने यावर लवकरात लवकर मार्ग काढावा असे देखील सांगितले आहे.
सध्या यूक्रेन आणि रशियामध्ये वाद निर्माण झाल्यामुळे इंधनच्या किंमती गगनात भिडल्या आहेत. याचा तोडा सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत, केंद्राकडून राज्याला जीएसटीचे साडेसव्वीस हजार कोटी मिळालेले नाहीत. जीएसटी काऊन्सिलमध्ये ठरल्याप्रमाणे एक ते दीड महिन्यात ते पैसे मिळतील. अशी माहिती केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
‘भारतातील ब्राम्हणांना वेगळा देश द्या’; कश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक अग्रिहोत्रींनी केली होती मागणी
फसवणूक केल्याप्रकरणी प्रवीण दरेकरांच्या विरोधात तक्रार दाखल; भाजप अडचणीत
आजोबांच्या निधनाने भावूक झाली प्राजक्ता गायकवाड, म्हणाली, ‘सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊ असं म्हणून सोडून गेलात’
घरामध्ये ‘हे’ एक छोटेसे डिव्हाईस बसवून बिनधास्तपणे करा कमाई, महिन्याला कमवा १ लाख रुपये